अशोक मोहिते हल्ल्यातील संशयित आरोपीला आज न्यायालयात करणार हजर Pudhari FIle Photo
Published on
:
07 Feb 2025, 7:22 am
Updated on
:
07 Feb 2025, 7:22 am
धारूर, पुढारी वृत्तसेवा
धारूर तालुक्यातील अशोक मोहिते यांच्यावर प्राणघातक हल्ला करून फरार झालेल्या वैजनाथ बांगर याला अटक करण्यात आली आहे. त्याला आज (शुक्रवार) दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तर त्यातील दुसरा मुलगा अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधार गृहामध्ये पाठवण्यात येणार आहे.
कर्नाटकातील शिरगुप्पी साखर कारखाना परिसरात हे दोघेजण लपल्याची माहिती धारूर पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. या कारखान्यावर धारूर तालुक्यातील ऊसतोड मजूर देखील ऊस तोडीसाठी गेलेले आहेत. ते राहत असलेल्या परिसरातच हे दोघे संशयित आरोपी लपले होते. त्यांना पकडण्यासाठी धारूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोलीस कर्मचारी अशोक कदम , सत्यप्रेम मिसाळ, दिनकर पुरी यांनी ऊसतोड मजुरांचा वेश घेत त्या परिसरात पाळत ठेवली, अन मोठ्या शीताफिने या दोघांना थेथुन अटक केली. यानंतर कांगवड पोलीस स्टेशन (जिल्हा बेळगाव) येथे हजर करत त्यांना धारूर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले आहे.
वैजनाथ बांगर याला आज दुपारी अडीच वाजता न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. तर त्यातील दुसरा अल्पवयीन असल्याने त्याला बीड येथील बालसुधार गृहात पाठवण्यात येणार आहे. पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.