Valentine Week List 2025: फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा दिवस… हा महिना म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रचंड प्रेम करता, त्या व्यक्तीसमोर मनातील भावना व्यक्त करण्याचा महिना… महिन्यात रोज डे पासून सुरु होणारा आठवडा अखेर 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी संपतो… हा आठवडा महत्त्वाचा आहे, हे खरं आहे, पण आपल्या आवडत्या व्यक्तीवर प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्या खास दिवसाची गरज नसते. प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्या दिवसाची किंवा कोणत्या वेळापत्रकाची गरज नसते. पण तुम्हाला आता व्हॅलेंटाईन आठवड्याचं वेळापत्रक पाळावं लागणार आहे. तर जाणून घ्या 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत कधी – कोणता दिवस साजरा कराल…
व्हॅलेंटाईन डेचा आठवडा (Valentine Week List 2024)
7 फेब्रुवारी – रोज डे, शुक्रवार
8 फेब्रुवारी – प्रपोज डे, शनिवार
9 फेब्रुवारी – चॉकलेट डे, रविवार
10 फेब्रुवारी – टेडी डे, सोमवार
11 फेब्रुवारी – प्रॉमिस डे, मंगळवार
12 फेब्रुवारी – हग डे, बुधवार
13 फेब्रुवारी – किस डे , गुरुवार
14 फेब्रुवारी – व्हेंलेंटाईन डे, शुक्रवार
या दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला चांगल्या भेटवस्तू देऊ शकता. 14 फेब्रुवारी हा दिवस प्रेम करणाऱ्यांसाठी प्रचंड खास आणि स्पेशल असतो. गेल्या काही वर्षांपासून 14 फेब्रुवारी या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. व्हॅलेंटाईन डेच्या आठवड्याची सुरुवात कायम 7 फेब्रुवारी पासून होते आणि 14 फेब्रुवारीपर्यंत प्रेमाचा आठवडा साजरा करण्यात येतो. म्हणजे आजपासून प्रेमाचा आठवडा सुरु झाला आहे.
सांगायचं झालं तर, बाजारात देखील सर्वत्र व्हॅलेंटाईन डेसाठी अनेक भेटवस्तू आल्या आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनरला आकर्षक भेटवस्तू देऊ शकता. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त व्हॅलेंटाईन डे आणि व्हॅलेंटाईन विकची चर्चा रंगली आहे. या सात दिवसांत सर्वत्र प्रेममय वादावरण पाहायला मिळणार आहे.
शिवाय तुम्ही अन्य कोणते प्लान देखील करू शकता. फिरायला जाण्यासाठी एखाद्या शांत जागेची निवड करणं. डेट देखील उत्तम पर्याय आहे किंवा तुम्ही लहान ट्रिप देखील करु शकता… त्यामुळे तुम्हाला एकत्र घालवण्यासाठी वेळ देखील मिळेल आणि तुमच्यातील नातं देखली अधिक घट्ट होईल…