परभणी/सेलू(Parbhani) :- तालुक्यातील हदगाव पावडे येथे एका ४८ वर्षीय चालकाने दारूच्या नशेत घरातील पत्राच्या लाकडी अडूला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide)केल्याची घटना ७ फेब्रुवारी रोजी पहाटे पाचच्या सुमारास उघडकीस आली आहे. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती याप्रमाणे तालुक्यातील हादगाव पावडे येथील चालक शेख अमीर शेख अहमद वय ४८ वर्षे याने दारू पिण्याच्या कारणावरून पत्नी व त्याच्यात झालेल्या वादातून राहत्या घरी पत्राच्या लाकडी अडूला ओढणीच्या साह्याने गळफास घेतल्याचे ७ फेब्रुवारी रोजी पहाटे पाचच्या सुमारास उघडकीस आले आहे.
परभणीतील सेलू पोलीसात आकस्मिक मृत्यूची करण्यात आली नोंद…!
सोहेल अमीर शेख यांनी दिलेल्या माहितीवरून सेलु पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वशिष्ठ भिसे, पोलीस नायक माधव कांगणे ,पोलीस शिपाई सोपान डुबे, हदगाव पावडे येथील पोलीस पाटील मंगल भागवत पावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रेत शवविच्छेदनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. देऊळगाव आरोग्य केंद्राचे (Health Centers) वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय लोया यांनी शवविच्छेदन(Autopsy) केल्यानंतर प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.चालक शेख अमीर याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. या घटनेमुळे हदगाव पावडे सह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.