Who is Mohini Mohan Dutta: दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे मृत्युपत्र उघडण्यात आले आहे. त्यानंतर त्या मृत्यूपत्रात आलेल्या एका नव्या नावाने खळबळ उडाली आहे. हे नाव आहे मोहिनी मोहन दत्ता. त्यांना या मृत्युपत्रानुसार 500 कोटींची रक्कम मिळणार आहे. या खुलासानंतर टाटा कुटुंबातील सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
द इकोनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, जमशेदपूर येथील मोहिनी मोहन दत्ता या कोणालाही माहिती नसलेल्या उद्योजकासाठी ₹ 500 कोटींहून अधिक रक्कमेची तरतूद रतन टाटा यांनी मृत्यूपत्रात केली आहे. मृत्यूपत्रातील ही बातमी समोर आल्यानंतर सर्वांना मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की कोण आहे मोहिनी मोहन दत्ता? रतन टाटा यांच्या जीवनात त्यांची काय भूमिका होती? त्यांच्यासाठी रतन टाटा संपती का ठेवून गेले?
कोण आहे मोहिनी दत्ता
मोहिनी मोहन दत्ता आणि रतन टाटा यांची पहिली भेट 1960 दशकात झाली. त्यावेळी रतन टाटा 24 वर्षांचे होते. जमशेदपूरच्या डीलर्स हॉस्टेलमध्ये ही भेट झाली. त्यावेळी रतन टाटा आपल्या कुटुंबाच्या विशाल साम्राज्यात मार्ग शोधत होते. त्या भेटीने मोहिनी दत्ता यांच्या आयुष्याची दिशा बदलली. 60 वर्षांपासून त्यांची ओळख आहे. डिसेंबर 2024 मध्ये रतन टाटा यांच्या जयंतीनिमित्त आमंत्रित केलेल्या निवडक लोकांमध्ये दत्ता यांचाही समावेश होता. मोहिनी दत्ता यांना दोन मुली आहेत. त्या टाटा ग्रुपमध्ये आहेत.
हे सुद्धा वाचा
असा आहे व्यावसायिक प्रवास
दत्ता यांचा व्यावसायिक प्रवास टाटा समूहाशी निगडीत आहे. दत्ता यांनी ताज समूहासोबत करिअर सुरू केल्यानंतर त्यांनी स्टॅलियन ट्रॅव्हल एजन्सीची स्थापना केली. 2013 मध्ये ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सच्या ताज सर्व्हिसेसमध्ये स्टॅलियन ट्रॅव्हल एजन्सीचे विलीनीकरण झाले. दत्ता आणि टाटा कुटुंबाचे संबंध व्यवसायपेक्षा कितीतरी पुढे होते.
दत्ता कुटुंबाला काय मिळणार
दत्ता कुटुंबाने मृत्यूपत्रासंदर्भात नाराजी व्यक्त केली. मृत्यूपत्रानुसार, टाटा यांची एक तृतीयांश संपत्ती मिळण्याचे ते दावेदार आहे. त्यात 350 कोटी रुपयांपेक्षा जास्त बँक डिपॉजिट, पेंटींग, घड्याळे यासारख्या खासगी वस्तू आहेत. दोन तृतीयांश वाट्यात रतन टाटा यांची सावत्र बहीण शिरीन जीजीभॉय आणि डीनना जीजीभॉय यांचा समावेश आहे. मृत्यूपत्रात नोएल टाटा आणि त्यांच्या मुलांची नावे नाहीत. दरम्यान दत्ता यांना 650 कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.