बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी तुरुंगात असलेल्या वाल्मीक कराड याची नार्को टेस्ट करा, अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे. आका तुरुंगात असतानाही त्याच्या गँगची दहशत कायम आहे, असं सुरेश धस माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले आहेत.
काय म्हणाले सुरेश धस?
सुरेश धस म्हणाले की, ”मी आका आणि त्याच्या सगळ्या सहकार्यांची नार्को टेस्ट करण्यास सांगितलं आहे. यातच दोन महिने झाले तरी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. अशोक मोहिते यांच्या प्रकरणात जे आरोपी होते, त्यांना कर्नाटकात अटक करण्यात आली असून ते कृष्णा आंधळेचे मित्र आहेत. मी अजूनही सांगतोय की, आका आणि त्यांच्या गँगचा माज संपलेला नाही.”