पंचवटी : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी रोडवरील एका खाजगी शाळेच्या पाठीमागील असलेल्या डोंगराळ भागातील वाळलेल्या गवताला अचानक आग लागल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. स्थानिक नागरिक व अग्निशामक दलाच्या प्रयत्नांनी आग विझविण्यात यश आल्याने पुढील अनर्थ टळला.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिंडोरी रोडवरील खाजगी शाळेच्या पाठीमागील बाजूस असलेल्या डोंगराळ भागातील वाळलेल्या गवताला अचानक आग लागली. याबाबत जागरूक नागरिकाने अग्निशामक दलाच्या पंचवटी कार्यालयाला दूरध्वनीवरून घटनेची माहिती कळविली. तातडीने अग्निशामक दलाचा एका बंबांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी हजर होत स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. यामुळे पुढील अनर्थ टळला व स्थानिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. यावेळी पंचवटी अग्निशामक दलाचे लिडींग फायरमन एम एच गायकवाड, फायरमन एम बी गोसावी, वाहनचालक व्ही एम शिंदे, चार ट्रेनी फायरमन यांसह अग्निशामक दलाचे कर्मचारी व नागरिकांनी आग आटोक्यात आणली.