ठाणे : पुढारी वृत्तसेवा एसटी महामंडळ अध्यक्षपदी राजकीय व्यक्तीच असतो. मध्यंतरी अध्यक्षपदी आमदार भरत गोगावले होते. ते मंत्री झाल्याने रिक्त झालेल्या पदावर संजय सेठी यांची नियुक्ती झाली असली तरी ती तात्पुरती असून लवकरच नवीन अध्यक्ष नियुक्त होईल, अशी भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडली.
एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांची नियुक्ती झाल्याने मंत्री सरनाईक यांना. हा धक्का असल्याची चर्चा रंगू लागली आहे. परिवहन मंत्री सरनाईक यांचे अधिकार कमी करण्यासाठी ही नियुक्ती झाल्याची टीका विरोधकांकडून होऊ लागली. त्यामुळे याबाबत परिवहन मंत्री सरनाईक यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी सेठी हे तात्पुरते अध्यक्ष असून लवकरच राजकीय नेता हा अध्यक्षपदी नियुक्त होईल असे स्पष्ट केले. या नियुक्तीचा राजकीय दृष्ट्या कोणीही भांडवल करू नये .मी या खात्याचा मंत्री आहे. सर्व जबाबदारी माझी आहे.
महामंडळाचे अध्यक्षपद असते. त्यांनी कुठलाही निर्णय घेतला असेल तर शेवटी अंतिम निर्णय परिवहन खात्याचा मंत्री म्हणून मीच घेत असतो, असेही त्यांनी स्पष्ट केलं.