सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच सध्या एक रील मोठ्या प्रमाणात पाहिली जात आहे, जी भारतीय रेल्वेच्या ‘गोल्डन चॅरियट’ ट्रेनशी संबंधित आहे. ‘गोल्डन चॅरियट’ ही ट्रेन केवळ पॅसेंजर ट्रेन नाहीये, तर आपण या ट्रेनला चालते फिरते आलिशान 5 स्टार हॉटेल म्हणू शकतो. कारण या ट्रेनमध्ये तुम्हाला ४० भव्य अशा लक्झरी खोल्या, एक स्पा, जिम आणि फाइव्ह स्टार हॉटेलसारख्या सुविधा आहेत. नुकतेच बेंगळुरूच्या यशवंत नगर येथून या लक्झरी ट्रेनमधून प्रवास करताना एका व्लॉगरने एक व्लॉग तयार केला आणि ट्रेनमधील दृश्य पाहून तुम्ही अचंबित व्हाल आणि म्हणाल ट्रेन आहे की फाइव्ह स्टार हॉटेल.
Golden Chariot ही भारतीय रेल्वेची एक राजेशाही ट्रेन आहे. तसेच ही ट्रेन दक्षिण भारतातील प्रमुख पर्यटन स्थळांचा प्रवास करते. दम्यान २३ जानेवारी २००८ रोजी बंगळुरू ते गोवा हा पहिला प्रवास घडला. दरम्यान ब्लॉगर अक्षय मल्होत्राने ‘प्राइड ऑफ कर्नाटक’ या लक्झरी ट्रेनचा पॅकेज घेत त्याच्या पत्नी सोबत प्रवास केला असून त्याने त्याच्या फॉलोअर्सना ट्रेनच टूरची संपूर्ण माहिती दिली आहे.
व्लॉगर अक्षयने ‘Journeys with AK’ त्याच्या युट्यूब चॅनेलवर संपूर्ण व्हिडिओ शेअर करत ट्रेन किती आलिशान आहे हे दाखवले आहे. ट्रेनमधील रेस्टॉरंटपासून ते शाही खोल्यांपर्यंत सर्व काही या व्हिडीओमध्ये दाखवले आहे. याशिवाय ट्रेनमध्ये जिम आणि स्पासारख्या सुविधाही आहेत. नंतर व्लॉगरने ट्रेनमध्ये असलेल्या जेवण आणि नाश्त्याचे देखील कौतुक केले आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलात तर व्लॉगर एका स्टेशनवर उतरतो आणि त्याच्या संपूर्ण टूर पॅकेजची माहिती शेअर करतो आणि सांगतो की त्याने स्वतःसाठी आणि त्याच्या पत्नीसाठी एकूण साडेआठ लाख रुपये इतके ट्रेनचे भाडे भरलेलं आहे. शिवाय परदेशी पर्यटकांसाठीच्या पॅकेजेसची ही माहिती सुद्धा दिली आहे. यूट्यूबवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत ५७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर दोन लाखांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे.
ट्रेनमध्ये एक रॉयल बार आहे, जिथे तुम्ही कॉकटेल पार्ट्यांचा आनंद घेऊ शकता. ट्रेनमध्ये कॉन्फरन्स रूम आणि टीव्हीही बसवण्यात आले आहेत. एका राजवाड्यात जे जे असते आणि माणसासाठी जी सुविधा असते, ते सर्व इथे उपलब्ध होते. विमानापेक्षाही या ट्रेनमधून प्रवास करण्याचा आनंद वेगळाच आहे.
गोल्डन चॅरियट या लक्झरी ट्रेनमध्ये उपलब्ध आहेत ही खास तीन पॅकेज
पहिले पॅकेज – या पॅकेजअंतर्गत तुम्ही कर्नाटकची शान असलेल्या बेंगळुरू, बांदीपूर, म्हैसूर, हलेबिडू, चिकमंगळूर, हम्पी आणि गोव्याला 5 रात्री/6 दिवसात प्रवास करू शकता.
दुसरे पॅकेज- गोल्डन चॅरियट या लक्झरी ट्रेनचे दुसरं पॅकेज म्हणजे ज्वैल्स ऑफ साऊथ आहे. जे बेंगळुरू, म्हैसूर, हंपी, महाबलीपुरम, तंजावूर, चेट्टीनाड आणि कोची अशी ट्रिप एन्जॉय करू शकता. जी 5 रात्री / 6 दिवसात कव्हर होतात.
तिसरे पॅकेज- या लक्झरी ट्रेनचे तिसरं पॅकेज म्हणजे ग्लिम्प्स ऑफ कर्नाटक आहे. ज्यात बेंगळुरू, बांदीपूर, म्हैसूर आणि हंपीची ट्रिप करू शकता. ज्यात 3 रात्री / 4 दिवस समाविष्ट आहे.