रिसोड (Swarga Ratha) : अंत्ययात्रेसाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा म्हणजे स्वर्ग रथ. या रथाची रिसोड येथे गेली अनेक दिवसापासून कमतरता भासत होती. कोणाच्या घरी निधन झाले की त्यांना स्वर्ग रथ हे वाशिम किंवा अन्य शहरावरून बोलवावे लागत होते. सदर बाब लक्षात घेता रिसोड शहरातील प्रसिद्ध व्यापारी नारायणदास बन्सीलालजी तोष्णीवाल उर्फ राजू शेठ यांनी रिसोडवासीयांच्या सेवेत सदर Swarga Ratha) स्वर्ग रथ रुजू केला आहे. दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सदर स्वर्ग रथाचे लोकार्पण करण्यात आले.
यानंतर सदर स्वर्ग रथ (Swarga Ratha) रिसोड वासियांच्या सेवेमध्ये प्रदान करण्यात आले. सदर स्वर्ग रथाचे लोकार्पण करताना ईश्वरदास तोष्णीवाल, गोपाल काबरा, मुरली मुदडा, डॉक्टर बियाणी, गोपाल कासट, ओमप्रकाश तोषनीवाल, पुरुषोत्तम काबरा, मुरली शेठ मुंदडा, श्याम भाऊ मुंदडा, पवन मुंदडा, विनोद लड्डा, सुरेश मुंदडा, पल्लोड सर, संतोष करवा, प्रकाश झंवर, अरुण तोतला, रामासेठ तोषनीवाल, कैलास सारडा, गोपाल मुदडा आदी माहेश्वरी समाज बांधव उपस्थित होते.