आखाडा बाळापूर/हिंगोली (Illegal sand) : कळमनुरी तालुक्यातील नांदापुर येथून अवैध रेती वाहतूक करणारे वाहन नांदापूर कळमनुरी रोडवर जांभरुण फाटा येथे ट्रॅक्टर पकडण्यात आले असून, पोलीस स्टेशन कळमनुरी येथे जमा करण्यात आले, आसल्याच मंडळ अधिकारी आनंद काकडे यांनी सांगितले.
कळमनुरी तालुक्यातील विविध भागात अवैध वाळू (Illegal sand) उपसा व वाहतूक होते सदर प्रकार रोखण्यासाठी महसूल विभाग पथक नेमण्यात आले आहे. गुरुवारी रात्री सदर पथकाने कारवाई करून ट्रक्टर पकडले. या पथकात आनंद काकडे मंडळ अधिकारी ,विशाल पतंगे ,प्रतीक पालखडे विकास पंडित विजय भंडारे, महेश गळा कटू,अमोल गंगावणे,आणि घुगे ग्राम महसूल अधिकारी सहभागी झाले होते.