छत्तीसगडची राजधानी रायपूरमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक विदेशी तरुणी दारूच्या नशेत भर रस्त्यात गोंधळ घालताना दिसत आहे. तर तिचा सहकारी पोलिसांना समजावताना दिसत आहे. रायपूरमध्ये गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या रस्ते अपघातानंतरचा हा व्हिडीओ आहे. ही तरुणी रशियन असून पोलिसांशी ती हुज्जत घालताना दिसत आहे.
या व्हिडीओसोबत एक मेसेजही व्हायरल होत आहे. यात ती तरुणी विदेशी असल्याचं सांगितलं जात आहे. एका तरुणाच्या मांडीवर ती बसून कार चालवत होती. त्याचवेळी गाडीवरील नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात झाला. येथील व्हिआयपी रोड परिसरात कारने एका एक्टिवाला धडक दिली. या स्कूटीवरून तीन जण जात होते. हे तिन्ही जण गंभीर जखमी झाला आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या हल्ल्यानंतर मात्र या तरुणीने जोरदार गोंधळ घातला. दारूच्या नशेत असलेली ही तरुणी पोलिसांशी वारंवार हुज्जत घालत होती.
व्हिडीओतील मेसेजनुसार ही तरुणी आणि तरूण दोघेही नशेत होते. दोघेही भारत सरकार असं लिहिलेली इंडिका कार चालवत होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. ही बातमीही वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर पोलिसांनी ही विदेशी तरुणी रशियन नसून उज्बेकिस्तानची असल्याचं सांगितलं.
पोलीस काय म्हणाले?
आता या प्रकरणात पोलिसांची प्रतिक्रिया आली आहे. रायपूरचे पोलीस अधिकारी लखन पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रायपूर शहरातील तेलीबांधा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्हीआयपी रोडवर हा अपघात झाला. त्यात एका कारने स्कूटीला जोरदार धडक दिली. त्यात तीन तरुणांना गंभीर मार लागला आहे, असं लखन पटेल यांनी सांगितलं.
रायपुर VIP रोड में आधी रात एक तेज़ रफ्तार कार ने एक्टिवा सवार तीन युवकों को टक्कर मार दी, उन्हें गंभीर हालत में भर्ती कराया गया है
बताया जा रहा कार रशियन युवती चला रही थी युवक की गोद में बैठकर
दोनों नशे में धुत थे, रशियन युवती ने मौके पर जमकर हंगामा किया
पुलिस ने दोनों को… pic.twitter.com/tRVNx20ml8
— Anshuman Sharma (@anshuman_sunona) February 6, 2025
तरीही कार चालवायला दिली
कार उज्बेकिस्तानची ही तरुणी चालवत होती. ही तरुणी 30 जानेवारीपासून व्हिसावर छत्तीसगडमध्ये राहत होती. तिचा सहकारी भावेश आचार्यसोबत ती कारने जात होती. दोघेही नशेत होते. तरुणीने प्रचंड दारू प्यायलेली आहे, हे माहीत असूनही या तरुणाने तिला कार चालवायला दिली. त्यामुळेच हा अपघात झाल्याचं पटेल यांनी स्पष्ट केलं.
दोघांना अटक
या प्रकरणात कार चालवणाऱ्या या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करण्यात आली असून रिमांडवर पाठवलं आहे. तिन्ही गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत. एकाच्या पायाला फ्रॅक्चर झालंय. शरीरावर अनेक ठिकाणी मार लागला आहे. या जखमा अत्यंत गंभीर आहेत. या प्रकरणी आम्ही अधिक तपास करत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.