हडस पिंपळगाव जवळ भीषण अपघात:आयशअर ट्रकच्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार, गुन्हा दाखल
3 hours ago
1
वैजापूर तालुक्यातील हडस पिंपळगाव जवळील बलाई पुलाजवळ आयशअर ट्रक व मोटार सायकलचा मोठा अपघात झाला. लासूर स्टेशन कडून वैजापूरच्या दिशेने जाणाऱ्या मोटार सायकल स्वरास आयशअरची जोरदार धडक बसून मोटार सायकल स्वराचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातातील मयत रमेश तुकाराम माळी (वय ५३ वर्ष, राहणार जेहूर कुंभारी, ता. कोपरगाव जि. अहिल्यानगर) हे नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गांवरून लासूर स्टेशन येथून वैजापूरच्या दिशेने दुचाकी क्र. MH 17 CW 6545 ने जात असतांना त्यांच्या दुचाकीला छत्रपती संभाजीनगर च्या दिशेने जाणाऱ्या आयशर ट्रक क्र. MH 20 GC 3799 ची हडस पिंपळगाव, लासूरगाव जवळील बलाई पुलाजवळ समोरासमोर धडक बसली. या भीषण अपघातात रमेश माळी जागीत गतप्राण झाले. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, अपघातातील मोटार सायकल ही पूर्णपणे आयशअरखाली दाबलेली होती. हा अपघात शुक्रवार रोजी दुपारी १२वाजेच्या सुमारास घडला. सदरील अपघातातील आयशअर चालकावर मयाताचा मुलगा चेतन रमेश माळी (रा. जेहूर कुंभारी ता. कोपरगाव) याच्या फिर्यादीवरून आयशअर ट्रक क्रMH 29GC 3799च्या चालकाविरुद्ध वैजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील याच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. रावते, पो. हे. गोरे हे अपघातच्या घटनेचा पुढील तपास करत आहे. या वेळी हडस पिंपळगांव येथील पोलिस पाटील कारभारी निघोटे, पो. पा. राजेन्द्र मोडके, लासूरगावचे पो. पा. बाबासाहेब हारिचद्रे, किशोर हारिचर्दे बाळासाहेब नेटके, रामेश्वर मोडके, बाळू निघोटे यांच्यासह आदी नागरिकांनी या अपघात समयी मदत केली.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)