कुंदा प्रोएक्टीव्ह अँबकस क्लास कन्हान च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
कन्हान (National Abacus Competition) : प्रोएक्टिव्ह अँबकस आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत कुंदा प्रोएक्टीव्ह अँबकस क्लास कन्हान ची हुशार विद्यार्थीनी कु. सान्वी श्रीधर केशेट्टी हिने भारता तुन प्रथम क्रंमाक पटकावित ईतर विद्यार्थ्यांनी घवघवी त यश संपादन करित आपल्या आई, वडिलांचे, कुंदा प्रोएक्टीव्ह अँबकस क्लास, कन्हान शहराचे नाव लौकिक केल्याने (National Abacus Competition) विद्यार्थ्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोल्हापुर येथे झालेल्या प्रोएक्टिव्ह अँबकस आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत कुंदा (National Abacus Competition) प्रोएक्टीव्ह अँबकस क्लास कन्हान ची हुशार विद्यार्थीनी कु. सान्वी श्रीधर केशेट्टी हिने पाच मिनिटात १०० पैकी १०० गणिते ई कँटेगरी मधुन अचुक सोडवुन भारतातुन प्रथम क्रंमाक पटकाविल्याने प्रोएक्टीव्ह कंपनीचे गिरीश करंडे सर व सारीका करंडे मँडम, ़अजय मनिवार, राजेश लोचानी सर, तेजस्विनी सांवत मँडम कुंदा डांगे मँडम आदी मान्यवरांच्या हस्ते कु. सान्वी केशेट्टी हिला सायकल, ट्राफी, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या अँबकस स्पर्धेत (National Abacus Competition) नऊ राज्या मधुन ६५०० विद्यार्थ्यानी सहभाग घेतला असुन राज्य स्तरातुन या स्पर्धेत प्रथम, व्दितीय, तुतीय क्रंमाकांने आलेले विद्यार्थी राष्ट्रीय स्पर्धेत पात्र होते. ६ मिनिटात शंभर गणित सोडवणे असे या स्पर्धे चे स्वरूप होते. या यशाबद्दल कुंदा प्रोएक्टीव्ह अँबक स क्लास कन्हान ची प्रशिक्षिका कुंदा डांगे मँडम याना सुध्दा सन्मानित करण्यात आले. भारतातुन प्रथम कु. सान्वी श्रीधर केशेट्टी, पार्थ कुंभलकर, पलक कुंभलक र, तृतीय प्रशिल डांगे, विघ्नेश सातपुते, आरव ढोबळे, कस्तुभ इंगोले, कुशन शेंडे, अक्षद लांजेवार, तिलक सातपुते, विराज लांजेवार आदी विद्यार्थ्यानी विजयी होऊन यश संपादन केल्याने कन्हान परिसरातुन या विजयी विद्यार्थ्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.