नागपूर - नागपूर महानगरपालिकेद्वारे तक्रारींसाठी तक्रार निवारण हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. या तक्रार निवारण हेल्पलाईनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी ‘रामगिरी’ निवासस्थान येथे लोकार्पण करण्यात आले.
तक्रार निवारण हेल्पलाईनद्वारे आता नागरिकांना 155304 या टोल फ्री क्रमांकावर आपली तक्रार नोंदविता येणार आहे.
मनपा तक्रार निवारण क्रमांकावर येणाऱ्या प्रत्येक फोनची दखल घेऊन नोंदविण्यात आलेली तक्रार संबंधित विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. याशिवाय नागरिकांकडून अभिप्राय देखील मागविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मुख्यमंत्री यांना दिली.