परभणीतील सोनपेठ पोलिसांची निळापाटी येथे कारवाई १० लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त…!
परभणी/सोनपेठ (Sonpeth Crime) : गंगाखेड ते परळी रोडवर निळा पाटी जवळ शुक्रवार ७ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास कारवाई करत पोलिसांनी वाळुची चोरटी वाहतूक करत असलेला टिप्पर ताब्यात घेतला. या (Sonpeth Crime) प्रकरणी सोनपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही (Sonpeth Crime) कारवाई पोनि. सुर्यमोहन बोलमवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार कृष्णा तिडके, नाटकर यांच्या पथकाने केली. पोलिसांनी एकूण पाच ब्रास आणि एक टिप्पर मिळून १० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बालाजी दत्तराव बंडगर, आकाश अडकिणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि. विनोद चव्हाण करत आहेत.
गोदापात्रातून वाळुची चोरी
पाथरी : तालुक्यातील गोडगाव येथील गोदावरी नदीपात्रातून वाळू चोरी करत असलेला एक टेम्पो पाथरी पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतला. ही (Sonpeth Crime) कारवाई ६ फेब्रुवारी रोजी करण्यात आली. पोलीस अंमलदार अशोक धस यांच्या फिर्यादीवरुन सगीर अन्सारी, तसेच वाहन मालकावर पाथरी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोना. कदम करत आहेत. या (Sonpeth Crime) कारवाईत दिड लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.