रोहे प्रतिनिधीः मध्य रेल्वे आंगणेवाडी जत्रेदरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड दरम्यान ४ विशेष गाड्या चालवणार आहे.
विशेष चालवण्यात येणाऱ्या गाड्यांमध्ये अ) लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड विशेष (२) ट्रेन क्रमांक 01129 ही विशेष ट्रेन दि. २१.२.२०२५ (शुक्रवार) रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ००.५५ वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी १२.०० वाजता पोहोचेल.ट्रेन क्रमांक 01130 ही विशेष ट्रेन दि. २१.२.२०२५ (शुक्रवार) रोजी १८.०० वाजता सावंतवाडी रोड येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.१० वाजता पोहोचेल.
ब) लोकमान्य टिळक टर्मिनस - सावंतवाडी रोड विशेष (२) ट्रेन क्रमांक 01131 विशेष ट्रेन दि. २२.२.२०२५ (शनिवार) रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ००.५५ वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी १२.०० वाजता पोहोचेल.ट्रेन क्रमांक 01132 विशेष ट्रेन दि. २२.२.२०२५ (शनिवार) रोजी १८.०० वाजता सावंतवाडी रोड येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.१० वाजता पोहोचेल.
या गाडींना ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ हे थांबे देण्यात आले आहेत.