चुम दरांगवर अश्लील कॉमेंट; एल्विश यादव-रजत दलाल ट्रोलर्सच्या निशाण्यावर Instagram
Published on
:
07 Feb 2025, 12:35 pm
Updated on
:
07 Feb 2025, 12:35 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क - चुम दरांगवरवर अश्लील कामेंट केल्याने एल्विश यादव आणि रजत दलाल ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत. "तिचं नाव चुम आहे आणि काम 'गंगुबाई' वाले..." असे ते म्हणाले. याचा क व्हिडिओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. आणि लोक दोघांना या विधानानंतर ट्रोल करत आहेत.
एल्विश यादव बिग बॉस ओटीटी सीजन २ चा विजेता (Elvish Yadav) आहे. तो स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. तो बिग बॉस सीजन १८ मध्येदेखील आला होता. आणि मीडियाशी त्याचा वाद देखील झाला होता. आता त्याने चुम दरांग (Chum Darang) विषयी असे वक्तव्य केले आहे की, त्याला ट्रोलर्सनी निशाण्यावर धरलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, एल्विश यादव बिग बॉस १८ मध्ये फायनालिस्ट रजत दलालला सपोर्ट करण्यासाठी गेला होता. पण मीडिया राऊंडमध्ये रिपोर्टर्सने करणला सपोर्ट केलं होतं. त्यानंतर एल्विशने करणवीर मेहरावर मीडिया खरेदी केल्याचा आरोप केला होता. आत त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो चुम दरांगची खिल्ली उडवताना दिसत आहेत.
एल्विशने चुम दरांगची उडवली खिल्ली
मीडिया रिपोर्टनुसार, एल्विश यादवचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये रजत दलाल देखील आला होता. एल्विश व्हिडिओमध्ये चुमची खिल्ली उडवताना दिसत आहे. ...तो म्हणतो... कारण चुम कुणाला आवडेल...कोरोना काळात...चुमच्या नावातच अश्लीलता आहे. नाव चुम आणि काम गंगूबाई...."