शिवभक्त मोठ्या आतुरतेने महाशिवरात्रीची वाट पाहात असतात. आराध्य दैवत महादेवांचा व्रत करण्याचा हा महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी शिव शंकर आणि माता पर्वती यांचा विवाह झाला होता. त्यामुळे या दिवशी भगवान शिवाची पूजा आणि अभिषेक करणं शुभ मानलं जातं. महाशिवरात्रीच्या दिवशी केलेला रुद्राभिषेक देखील विशेष फलदायी मानला जातो.त्याचे फळ हजारो पटीने मिळते असं ज्योतिषशास्त्र सांगतं. धार्मिक मान्यतेनुसार, महादेव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने संकटांचा अंत होतो. तसेच जीवनात सुख समृद्धी येते. हिंदू पंचांगानुसार, माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशीची तिथी बुधवारी 26 फेब्रुवारीला 11 वाजून 8 मिनिटांनी सुरु होईल. तसेच या तिथीचं समाप्ती 27 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजून 54 मिनिटांनी होईल. त्यामुळे 27 फेब्रुवारीला सकाळी अमावास्य सुरु होते. त्यामुळे 26 फेब्रुवारीलाच महाशिवरात्री साजरी केली जाईल. उदयतिथीनुसार 26 फेब्रुवारी रोजी उपवास आणि पूजा केली जाईल.
26 तारखेला रात्रीचे 12 वाजल्यानंतर रात्रीची पूजा केली जाईल. महाशिवरात्रीत रात्रीच्या वेळी पूजेचं महत्त्व आहे. या दिवशी निशा काळी 26 फेब्रुवारीला 12 वाजून गेल्यानंतर 27 फेब्रुवारीला रात्री 12 वाजून 9 मिनिटांपासून 12 वाजून 59 मिनिटांपर्यंत असेल. भगवान शिवांची पूजा करण्यासाठी 50 मिनिटे मिळतील. तंत्र, मंत्र आणि सिद्धीच्या दृष्टिकोनातून हा काळ अत्यंत शुभ मानला जातो.
चौथ्या प्रहरातील पूजेसाठी शुभ मुहूर्त
- रात्रीच्या पहिल्या प्रहर पूजेची वेळ – संध्याकाळी 6 वाजून 19 मिनिटं ते रात्री 9 वाजून 26 मिनिटांपर्यंत असेल.
- रात्रीच्या दुसऱ्या प्रहर पूजेची वेळ : 26 फेब्रुवारी रात्री 9 वाजून 26 मिनिटं ते 27 फेब्रुवारी 12 वाजून 34 मिनिटांपर्यंत असेल.
- रात्रीचा तिसरा प्रहर पूजेची वेळ – 27 फेब्रुवारी रात्री 12 वाजून 34 मिनिटांपासून ते पहाटे 3 वाजून 41 मिनिटांपर्यंत असेल.
- रात्रीच्या चौथ्या प्रहर पूजाची वेळ – 27 फेब्रुवारीला पहाटे 3 वाजून 41 मिनिटांपासून सकाळी 6 वाजून 48 मिनिटांपर्यंत असेल.
महाशिवरात्रीचा व्रत पारण शुभ मुहूर्त 27 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजून 48 मिनिटांपासून सकाळी 8 वाजून 53 मिनिटांपर्यंत असेल. यावेळी महाशिवरात्रीचा उपवास सोडू शकतात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)