साकोली जवळील बोदरा येथील घटना
सेंदूरवाफा (Youth Death) : चिखलाने माखलेला ट्रॅक्टर धुण्यासाठी तलावात गेलेल्या युवकाचे ट्रॅक्टर तलावात उलटून झालेल्या अपघातात हृदयद्रावक निधन झाले. ही (Youth Death) घटना साकोली तालुक्यातील बोदरा येथे दि. ७ फेब्रुवारी २०२५ शुक्रवारला सकाळी सकाळी ९.४५ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली असून अतुल दादू कापगते(३५) असे मृतक युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, साकोली जवळील बोदरा येथील युवा शेतकरी अतुल दादू कापगते हा दि. ७ फेब्रूवारी २०२५ रोजी सकाळी आपला ट्रॅक्टर क्रमांक एम. एच. ३५ ए. ९४४९ घेवून तीन एकरातील उन्हाळी धानाच्या रोवण्यासाठी चिखलणी केल्यानंतर स.९.४५ वाजताच्या दरम्यान चिखलाने माखलेला ट्रॅक्टर धुण्यासाठी गावातलगच्या तलावात गेला होता. यावेळी (Youth Death) ट्रॅक्टर रिव्हर्स घेत असता ट्रॅक्टर अचानक उलटल्याने तो खोल पाण्यात बुडाला.
अतुलला पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. साकोली पोलिसांनी घटनेचा मर्ग दाखल केला असून शवविच्छेदनानंतर अतुलच्या मृतदेहावर बोदरा येथील स्मशानभूमित दि. ७ फेब्रुवारी ला दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. अतुल कापगते यांच्या मृत्यूपश्चात पत्नी तसेच ६ व ३ वर्षांच्या दोन चिमुकल्या मुली आहेत. घरातील कर्ता पुरूष गेल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. (Youth Death) घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.