परभणीच्या इसाद येथील घटना
परभणी/गंगाखेड (Gangakhed Crime) : घराचा हिस्सा व पैसे का मागतोस असे म्हणत भाऊ व पुतण्याने लोखंडी रॉडने मारून एकास जखमी केल्याची घटना तालुक्यातील इसाद येथे घडली आहे. याप्रकरणी बुधवार ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी (Gangakhed Crime) गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील इसाद येथील बालासाहेब शेषराव भोसले व त्यांचा भाऊ प्रकाश शेषराव भोसले यांच्यात घराचा हिस्सा व पैशाच्या देवाण घेवाणीवरून वाद चालू आहे. शनिवार १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बालासाहेब शेषराव भोसले हे शेतातून घराकडे जात असतांना त्यांचा भाऊ प्रकाश शेषराव भोसले व त्याचा मुलगा प्रथमेश प्रकाश भोसले हातात लोखंडी रॉड घेऊन समोर आले.
तु घरात हिस्सा व पैसे कस काय मागतोस असे म्हणून भाऊ प्रकाश भोसले याने शिवीगाळ केली तर पुतण्या प्रथमेश भोसले याने लोखंडी रॉडने डोक्यात मारून जखमी केले तसेच भावाने पाठीत व उजव्या पायाच्या पिंढरीवर मारहाण करत मुक्कामार मारून तु पुन्हा घराचा हिस्सा व पैसे मागितले तर तुला खतम करून टाकतो अशी जिवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद बालासाहेब शेषराव भोसले वय ५५ वर्ष रा. इसाद यांनी बुधवार ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी गंगाखेड पोलीस ठाण्यात दिल्यावरून दोघांविरुद्ध (Gangakhed Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संभाजी शिंदे, पो.शि. धनंजय कनके हे करीत आहेत.