कृषि विभागातर्फे चौकशीचे दिले आदेश
हिंगोली (Pik Vima) : यावर्षी खरीप हंगामात जवळपास २ लाख ५० हजार शेतकर्यांनी पिकविमा भरला आहे. ज्यामध्ये तब्बल ४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर १८१४ शेतकर्यांनी बोगस पिकविमा भरल्याचे प्राथमिक तपासणी दरम्यान स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालयाने दिले आहे.
जिल्ह्यात यंदा खरिप हंगामात भरलेल्या अडीच लाख शेतकर्यांनी भरलेल्या (Pik Vima) पिकविम्यात प्रामुख्याने कापुस, तुर, सोयाबीन या पिकांचा समावेश आहे. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांना पिकविमा मिळण्याची प्रतिक्षा आहे. जिल्ह्याातील नुकसानीचा अहवाल देखील महसुल प्रशासनाने शासनाकडे सादर केला आहे.
शेतकर्यांना पिकविमा (Pik Vima) मिळाला नसल्याने अनेक शेतकर्यांनी प्रशासनाकडे निवेदन दिले आहेत. तसेच नामदेव पतंगे, गजानन कावरखे, गजानन सावके यासह इतर शेतकर्यांनी वेगवेगळे आंदोलन करून शासनाच्या निर्दशनास पिकविम्या बाबतची बाब आणुन दिली. तरीही पिकविमा बाबत कोणतीही कारवाई झाली नाही. राज्यातील बीडसह इतर काही जिल्ह्यात बोगस पिकविमा भरल्याचे उघड झाल्यानंतर हिंगोली जिल्ह्यातही कृषि विभागाने प्राथमिक चौकशी केली. ज्यामध्ये ७६ शेतकर्यांनी २०७ हेक्टर क्षेत्रावर शासकीय जमिनीवर (Pik Vima) पिकविमा भरला असुन त्यात १ कोटी १२ लाख रुपयाची पिकविमा रक्कम संरक्षीत केली आहे.
यामध्ये १९ शेतकर्यांनी स्वत: तर ५७ शेतकर्यांनी सीएससी केंद्रावरून (Pik Vima) पिकविमा भरला आहे. या शिवाय १७३८ शेतकर्यांनी ४३०९ हेक्टर क्षेत्राचा पिकविमा भरला असुन त्यातून २३ कोटी ५२ लाख रुपयांची रक्कम विमा संरक्षित केली आहे. यात ८६ शेतकर्यांनी स्वत: तर १६५२ शेतकर्यांनी सीएससी सेंटरवर विमा भरला आहे. विशेष म्हणजे या विमा धारक शेतकर्यांच्या जमिनीची महसुल अभिलेखाला नोंदच नसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात एकुण १८१४ शेतकर्यांनी ४५१७ हेक्टर क्षेत्रावर बोगस पिकविमा भरल्याचे स्पष्ट होत असुन या शेतकर्यांनी २४ कोटी ६४ लाख रुपयाची रक्कम संरक्षित केल्याचे दिसून आले आहे. या शेतकर्याबाबत संशय आल्याने या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात बोगस पिकविमा (Pik Vima) भरणार्या शेतकर्यांमध्ये काही बाहेर जिल्ह्यातील शेतकर्यांचा समावेश असल्याचे सुत्रांनी सांगितले.
एकुणत: या प्रकरणात जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी पाचही तालुका कृषि अधिकारी कार्यालयास पत्र पाठविले. यामध्ये संशयीत बोगस पिकविम्याची कृषि सहाय्यकामार्फत शंभर टक्के तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे होणार्या चौकशीकडे व कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हिंगोली जिल्ह्यात अडीच लाख शेतकर्यांनी (Pik Vima) पिकविमा भरला. ज्यामध्ये १८१४ शेतकर्यांनी ४५१७ हेक्टर क्षेत्रावर बोगस पिकविमा भरल्याचे स्पष्ट झाले असुन या शेतकर्यांनी २४ कोटी ६४ लाख रुपयांची रक्कम विमा संरक्षित केल्याचे दिसून आले आहे.