परभणी रेल्वे स्थानकावरील घटना
परभणी (Parbhani Crime) : साईनगर शिर्डी या रेल्वेने प्रवास करत असलेल्या महिलेजवळील सोन्याचे दागिने, रोख रक्कम मिळून ८१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. ही घटना रेल्वे परभणी येथील स्थानकावर उभी असताना घडली. या (Parbhani Crime) प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरुणा कुमारी ही महिला साईनगर शिर्डी या रेल्वेने प्रवास करत होती. पहाटेच्या दरम्यान महिलेला झोप लागली. याचाच फायदा घेत अनोळखीने महिलेजवळील बॅग लंपास केली. या बॅगमध्ये ८० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन आणि रोख दिड हजार रुपये होते. चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने तक्रार दाखल केली. सदरचे प्रकरण (Parbhani Crime) परभणी रेल्वे स्थानकावरील असल्याने लोहमार्ग पोलिसांकडे गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.
दुसरी घटना सिकंदराबाद – मुंबई देवगिरी एक्सप्रेसमध्ये घडली. या ठिकाणी अज्ञात चोरट्याने एका प्रवाशाजवळील २८ हजार ५०० रुपये किंमतीचा मोबाईल चोरुन नेला. करणकुमार इंगळे यांच्या जवळील मोबाईल चोरट्याने लंपास केला. तक्रारदार हे जनरल डब्ब्यामधून प्रवास करत होते. (Parbhani Crime) परभणी येथून रेल्वे सुटल्यानंतर त्यांना त्यांच्या जवळील मोबाईल चोरीला गेल्याचे समजले. आणखी एका घटनेत नांदेड – पुणे एक्सप्रेसने प्रवास करत असताना पूर्णा ते परभणी रेल्वे स्थानका दरम्यान जीवनसिंग रामगडीया यांच्या जवळील २० हजार रुपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. इतर एका घटनेत पूर्णा रेल्वे स्थानकावर जयपुर एक्सप्रेस मधून अज्ञात चोरट्याने प्रवाशाजवळील रोख रक्कम आणि मोबाईल मिळून २२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. सौ. सविता दामोधर यांच्या जवळील साहित्य चोरीला गेले. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वृध्दाजवळील मोबाईल चोरीला
पनवेल एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना गाडी पूर्णा रेल्वे स्थानकावर आली असता अनोळखी चोरट्याने वृध्दा जवळील १७ हजार रुपये किंमतीचा मोबाईल, एटीएम कार्ड व इतर कागदपत्रे चोरुन नेली. नरहरी सुर्यवंशी यांच्या जवळील साहित्य लंपास करण्यात आले. या (Parbhani Crime) प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.