अस्मिता टोकदार झाल्याने विनोदी लेखन करणे जोखमीचे:अभिनेते हृषिकेश जोशी यांचे प्रतिपादन

4 days ago 3
खेळकर वृत्तीने विनाद स्विकारण्याची क्षमता दिवसागणिक कमी होत असून प्रत्येकाच्या वैयक्तिक सामुहिक आणि जाती -पातीच्या समूहाच्या अस्मिता टोकदार झाल्याने विनोदी लेखन करणे जोखमीचे होत चालले आहे, असे मत प्रसिध्द अभिनेते आणि लेखक हृषिकेश जोशी यांनी व्यक्त केले. ग्रंथाली प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि प्रसिध्द लेखिका सारिका कुलकर्णी लिखित 'बे दुणे पाच' या पुस्तकाचे प्रकाशन अभिनेते आणि लेखक हृषिकेश जोशी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध लेखक मुकुंद टाकसाळे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि लेखिका सारिका कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना हृषिकेश जोशी म्हणाले की, एखादा प्रसंग निवडून त्यातील विसंगती टिपत विनोद निर्मिती करताना आम्हाला संहिता देखील अनेक वेळा तपासून पहावी लागते. समाजाचा सहनशिलतेचा आलेख खालावत असून विनोद विविध बंधनांच्या काटेरी कुंपणात अडकला आहे. मुळात विनोद सुचणे आणि तो शब्दात मांडता येणे ही दोन्ही वेगवेगळी कौशल्य आहेत. ज्याला विनोद लिहिता येतो त्याला तो सादर करता येईलच असे नाही आणि ज्याला सादर करता येतो त्याला तो लिहिता येईलच असे नाही. मुळात विनोद सुचण्यासाठी तुमची वृत्ती आनंदी असणे गरजेचे आहे. ती मूळ वृत्ती अंगिकृत असली तर स्मशान भूमित होणाऱ्या अत्यंसंस्कारा पासून श्रध्दांजली सभे पर्यंत अनेक ठिकाणी तुम्हाला विनोदी प्रसंग दिसून येतात. एकच प्रसंग अनेकांसमोर घडला असला तरी तुमची विनोदबुद्धी जागृत असल्यास त्या प्रसंगातील व्यंग आणि विरोधाभास तुम्ही विनोदाच्या अंगाने टिपतात. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, समाजाच्या विविध अंगाला वाहिलेले ग्रंथ आपणास आढळून येतात , परंतू विनोदाला वाहिलेला ग्रंथ आढळून येत नाही. विनोदाचा प्रवास क्षीण होत चालला असून विनोद पचवण्याची ताकद समाजात राहिली आहे का, हा आत्म परिक्षणाचा विषय आहे. समाजाची विनोद बुद्धी क्षीण होत जाणे हे सामाजिक अधोगतीचे लक्षण आहे. लेखक मुकुंद टाकसाळे म्हणाले की ,लेखकांनी लिहित राहिले पाहिजे. जशी गायकाला रियाजाची आवश्यकता असते त्याच धर्तीवर लेखकाने सातत्याने लेखनाचा सराव सुरू ठेवला पाहिजे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article