आईचा खून करुन अटॅक आल्याचा बनाव, तक्रारीनंतर मुलाला अटक:चिक्कलगी येथील घटना, जमीन नावाने करत नसल्याचा होता रांग
3 hours ago
1
शेतजमीन नावावर करत नाही, खर्चासाठी पैसे देत नसल्याच्या रागातून मुलानेच आईचा मानेचा हाड मोडून खून केला आणि नंतर ॲटकने मृत्यू झाल्याचा बनाव केला. दरम्यान मामाला भाच्याचा संशय आल्याने त्याने फिर्याद दाखल केल्यानंतर खूनाचा प्रकार समोर आहे. ही घटना १४ नोव्हेंबर रोजी रात्री साडे सात वाजता घडली. शुक्रवारी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. तंग्याव्वा गुरुसिध्दप्पा हत्ताळी असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मुलगा चनप्पा उर्फ चनगोंडा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीचा मामा धुंडाप्पा मल्लाण्णा चौगुले रा जंगलगी यांनी फिर्यादी दिली आहे. फिर्यादी चौगुले हे मृताचा भाऊ व आरोपीचा मामा आहे. १४ नोव्हेंबररोजी रात्री ७:३० वाजण्याच्या सुमारास बहिण तंग्याव्वा हिचा चिक्कलगी या गावी मृत्यू झाल्याचे समजले. त्यानंतर ते चिक्कलगी येथे गेल्यावर त्यावेळी फिर्यादीला मेव्हणा गुरसिध्दप्पा व भाचा चनप्पा उर्फ चनगोंडा यांनी बहिण तंग्याव्वा हिंस ॲटकने मयत झाल्याचे सांगितले, तर तेथे आलेले इतर नातेवाईक यांना भाचा चनप्पा याने बहिण तंग्याव्वा ही विहीरीत पडून मयत झाल्याचे सांगितले. फिर्यादीस संशय आल्याने त्यांनी मंगळवेढा पोलीस ठाणेस खबर दिली, पोलीसांनी पंचनामा केल्यानंतर तेथील डॉक्टर यांनी तंग्याव्वा हिचे मानेचे हाड मोडल्याने ती मृत झाल्याचे सांगितले, फिर्यादीची बहिणीस मुलगा चनप्पा हा सुमारे तीन वर्षापासुनशेती जमीन नावावर करुन देत नाही व खर्चासाठी मला पैसे का देत नाही याकारणावरुन मारहाण करत होता. त्याकारणावरुनच बहिण तंग्याव्वाचा खून झाल्याची फिर्याद दिली.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)