पुरुष प्रधान संस्कृतीत मुलांना मुली पेक्षा जास्त महत्व दिले जाते मात्र ही बाब आता काळाच्या ओघात हळूहळू लोप पावत चालली आहे या परंपंरेला छेद देत मुलींनी आईच्या पार्थीवाला भडाग्नी दिला. तालुक्यातील रूध्दा येथे वृध्दपकाळाने निधन झालेल्या आईच्या चित्तेस मुलीने भडाग्नी दिला असून समाजातील अनिष्ट, रूढी परंपरेला छेद देत समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
या बाबत घडलेली घटना अशी की शेन्नी ता.अहमदपूर येथील मुळ रहिवाशी असलेल्या पण रूध्दा ता.अहमदपूर येथे लेकीकडे वास्तव्यास असलेल्या सुगंधाबाई किशनराव गीत्ते या वृध्द महिलेचे वयाच्या 110 व्या वर्षी वृध्दपकाळाने 28 नोव्हेंबर रोजी निधन झाले. सुगंधाबाई किशनराव गीत्ते यांना 2 मुले व 6 मुले आहेत पण बर्याच वर्षांपासून रूध्दा येथील सुंदरबाई ज्ञानोबा नागरगोजे या मुलींकडे बर्याच वर्षांपासून त्या राहत होत्या. त्यांच्या म्हातारपणात पालन-पोषणाची जबाबदारी त्यांनीच पार पाडली होती. 28 नोव्हेंबर रोजी वृध्दपकाळाने त्यांनी अखेरचा श्वास घेतल्यावर त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली.घरापासून स्मशानभूमी पर्यंत सुंदरबाई ज्ञानोबा नागरगोजे यांनी हातात मडके घेत धीरोदात्तपणे वाटचाल सुरू करीत आपल्या आईस भडाग्नी देऊन अंतीम संस्काराचे सोपस्कार पार पाडत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.