आक्षेपार्ह छायाचित्रे काढून मारहाण करीत लूटमार, 3 जण ताब्यात:ग्रिंडर डेटिंग ॲपचा वापर करून तरुणांना लुटणारी अहिल्यानगरची टोळी जेरबंद

3 days ago 4
ग्रिंडर डेटिंग अॅपचा वापर करीत अनोळखी व्यक्तींशी संपर्क साधून त्यांना लुटणाऱ्या अहिल्यानगर येथील सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला असून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ग्रिंडर डेटिंग अॅपचा वापर करून अनोळखी व्यक्तींशी संपर्क साधून त्याला बोलवायचे. त्यांचे आक्षेपार्ह छायाचित्रे काढून त्याला मारहाण करीत पैसे उकळायचे अशी गुन्हेगाराची पद्धत होती. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत या टोळीला जेरबंद केल्याची माहिती पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली. या प्रकरणी अहिल्यानगर येथील सुशांत पोपट नागरे (२५), मयूर राजू गायकवाड (२४), श्रेयस भाऊसाहेब आंग्रे (२४) यांना ताब्यात घेतले. तसेच त्यांनी गुन्ह्यात वापरलेली चारचाकी पोलो कारदेखील जप्त करण्यात आली. तक्रारदार रस्त्यावर उभे असताना एका कारमधून आलेल्या व्यक्तींनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गाडी थांबवली. त्याला बळजबरीने गाडीत बसवून मारहाण केली. मोबाइल हिसकावला. त्याला पुणे-नगर महामार्गावरून घेऊन जात होते. परंतु कारेगाव ग्रिंडर डेटिंग अॅपचा वापर करून...येथे पाण्याची बाटली घेण्यासाठी भामटे गाडीतून उतरल्यावर तक्रारदाराने संधी साधून तेथून पळ काढला. तो थेट शिक्रापूर पोलिस ठाण्यात गेला. घटनेच गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ तपासचक्रे फिरवली. सीसीटीव्ही फुटेज, कारच्या वर्णनावरून भामट्यांचा शोध सुरू केला. कार नगरच्या दिशेने निघाल्याचे माहिती असल्याने जिल्ह्यातील गुन्हेगारांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. ही कार अहिल्यानगर येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार सुशांत पोपट नागरे वापरत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तिथे जाऊन त्याच्या व त्याचे साथीदार मयूर गायकवाड आणि श्रेयस आंग्रे यांच्या मुसक्या बांधल्या. दरम्यान, या गुन्हेगारांनी आणखी किती व्यक्तींकडून पैसे उकळले त्याचा पोलिस शोध घेत आहेत. कॉलेजियन मुलांच्या चर्चेतून लुटण्याची कल्पना अहिल्या नगर येथे एका महाविद्यालयाच्या जवळ ते असताना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या चर्चेदरम्यान त्यांना डेटिंग ॲप बद्दल माहिती मिळाली .तसेच या माध्यमातून ‘गे’ प्रकारासाठी वेगवेगळ्या व्यक्तींना बोलावून त्यांना कार मध्ये बसून लुटण्याचा प्रकार आरोपी करत होते .अशाप्रकारे मागील १० दिवसातच पोलिसांकडे तब्बल पाच गुन्हे दाखल झाले आहेत अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. काहीजणांनी आरोपींना ऑनलाइन देखील पैसे दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. गुन्ह्याची मोडस ऑपरेंडी : आक्षेपार्ह छायाचित्रांद्वारे ब्लॅकमेलिंग ग्रिंडर डेटिंग अॅपवरून अनोळखी व्यक्तींशी संपर्क साधायचा. त्याचे लोकेशन घेऊन त्याला तेथून सोबत घ्यायचे. नंतर संबंधित व्यक्तीला धमकावून आक्षेपार्ह छायाचित्रे काढायची. नंतर ती छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण करून त्याच्याकडून पैसे उकळायचे, अशी अारोपींची मोडस अॉपरेंडी होती. अशा एकूण पाच घटना समोर आल्या आहेत. त्यातून या चोरट्यांनी ८० हजार रुपये उकळल्याचे समोर आले आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article