Aaditya Thackeray Responsibility : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. राज्यात महायुतीला २३० जागांसह स्पष्ट बहुमत मिळाले. तर महाविकासआघाडीला मात्र मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. महायुतीला २३० जागांवर विजय मिळाला. तर महाविकासआघाडीला केवळ ४६ जागांवर समाधान मानावे लागेल. यामुळे राज्यात महायुतीचे सरकार येण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. महाविकासआघाडीचा विधानसभेत मोठा पराभव झाल्याने आता ठाकरे गटाचे नेते […]
आदित्य ठाकरे
Aaditya Thackeray Responsibility : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. राज्यात महायुतीला २३० जागांसह स्पष्ट बहुमत मिळाले. तर महाविकासआघाडीला मात्र मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. महायुतीला २३० जागांवर विजय मिळाला. तर महाविकासआघाडीला केवळ ४६ जागांवर समाधान मानावे लागेल. यामुळे राज्यात महायुतीचे सरकार येण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. महाविकासआघाडीचा विधानसभेत मोठा पराभव झाल्याने आता ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांना एक मोठी संधी पक्षाकडून देण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे यांची ठाकरे गटाच्या विधिमंडळाचे गटनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांची वर्णी लागली आहे. तसेच सुनील प्रभू यांची पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या प्रतोदपती नियुक्ती करण्यात आली आहे.