महाराष्ट्रात बिहार, हरियाणा पॅटर्न राबवा:शिंदेंना मुख्यमंत्री करा, नरेश म्हस्केंची मागणी; बिहार वेगळा, महाराष्ट्र वेगळा - रावसाहेब दानवे
2 hours ago
1
महाराष्ट्रात बिहार आणि हरियाणा सारख पॅटर्न राबवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. बिहार आणि हरियाणात कमी जागा आलेल्या मित्रपक्षांना मुख्यमंत्रीपद दिले तसे महाराष्ट्रातही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री जाईल, असा आम्हाला विश्वास असल्याचे म्हस्के म्हणाले. नरेश म्हस्के यांच्या मागणीवर रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. बिहार वेगळा आणि महाराष्ट्र वेगळा, असे दानवे म्हणाले. विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक 132 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हायला हवेत, अशी मागणी भाजपातून होते आहे. तर एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करावे, असे शिवसेनेतील नेते म्हणत आहेत. तर अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसमधून होत आहे. अशात महाराष्ट्रात बिहार, हरियाणा पॅटर्न राबवण्यात यावा अशी मागणी शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे. काय म्हणाले नरेश म्हस्के?
बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या कमी जागा येऊनही त्यांना मुख्यमंत्री घोषित केले होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रतही बिहार पॅटर्न राबवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून जाहीर केले जाईल, असा आम्हाला विश्वास आहे. हरियाणातही सैनी यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली आणि त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री करण्यात आले. ज्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली जाते त्यांनाच मुख्यमंत्री केले जाते, हा पॅटर्न एनडीएने राबवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही तसेच होईल, असे आम्हाला वाटते, असे नरेश म्हस्के म्हणाले. शेवटी महायुतीचे सगळे नेते योग्य तो निर्णय करतील. मात्र जे.पी. नड्डा, अमित शाह, नरेंद्र मोदी हे एकनाथ शिंदेंचे नाव जाहीर करतील, असेही ते म्हणाले. बिहारमध्ये आधीच ठरले होते, महाराष्ट्रात नाही - दानवे नरेश म्हस्के यांच्या मागणीवर भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांच्यासोबत लढलो, त्यांच्यासोबत बसून निर्णय करावे लागतात. बिहार वेगळे आहे आणि महाराष्ट्र वेगळा आहे, कितीही आमदार आले तरी नितीश कुमार मुख्यमंत्री राहतील, असे तिथे ठरवलेले होते. मात्र महाराष्ट्रात आम्ही कोणताही चेहरा ठेवलेला नाही, असे रावसाहेब दानवे म्हणाले. विधीमंडळ पक्षाची नेते निवड होईल, भाजप देखील लवकर निवड करेल आणि त्यानंतर मित्र पक्षांसोबत बैठक होईल आणि नंतर मुख्यमंत्र्यांची निवड होईल, असेही त्यांनी सांगितले. हे ही वाचा... आजचे एक्सप्लेनर:फडणवीस प्रबळ दावेदार, मात्र अनेक फॅक्टर शिंदेंच्या बाजूने; महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल जाणून घ्या सर्वकाही यावेळचा सर्वात मोठा प्रश्न आहे – महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? प्रश्न महत्त्वाचा आहे कारण हा केवळ युतीच्या मुख्यमंत्र्यांचा विषय नाही, तर तो महाराष्ट्राचे भविष्यातील राजकारण ठरवेल. आजचे एक्सप्लेनर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदाच्या दाव्यावर…सविस्तर वाचा...
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)