आमदार मुंबईत, मंत्रिपदासाठी फिल्डिंग‎:लंघे शिंदे सेनेकडून, विखे भाजप तर आमदार जगताप दादांकडून रांगेत‎

2 hours ago 1
विधानसभा निवडणुकीनंतर विजयी आमदारांनी मुंबई‎गाठली असून, नव्या कारभाऱ्यांना मंत्रिपदाचे वेध लागले‎आहेत. इच्छुकांमध्ये मोठी रस्सीखेच असल्याने,‎मंत्रीपदाची हौस पुरवताना महायुतीतील श्रेष्ठींची,‎दमछाक होणार आहे. जिल्ह्यात शिंदे सेनेसह दादांच्या‎राष्ट्रवादीकडून प्रत्येकी एक मंत्रिपदासाठी प्रयत्न होत‎असतानाच, भाजपकडूनही दोन मंत्रिपदासाठी प्रयत्न सुरू‎आहेत. तीस वर्षानंतर आ. संग्राम जगतापांच्या रूपाने नगर ‎‎शहराला मंत्रिपदाची अपेक्षा आहे. अशा स्थितीत ‎‎मंत्रिमंडळात, पहिल्या यादीत जिल्ह्यातील कोणाची वर्णी ‎‎लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.‎ विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ‎‎महायुतीचे आमदार मुंबईला गेले आहेत. सत्तास्थापनेच्या ‎‎हालचालींना वेग आला अाहे. मंगळवारी (२६ नोव्हेंबर) ‎‎नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकतो, असा अंदाज ‎‎आहे. तत्पूर्वी महायुतीमध्ये मंत्रिपदाच्या वाटपासाठी ‎‎फॉर्म्युल्यावर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून ‎‎देण्यात आली.पाच ते सहा आमदारांमागे एक मंत्रीपद‎असे सूत्र ठरवल्यास जिल्ह्याला दोन मंत्रीपदे मिळतील,‎पण जिल्ह्याचे राजकीय महत्व पाहता तीन मंत्रीपदे ‎‎जिल्ह्याच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. नेवासेत ‎‎ठाकरेंच्या शिवसेनेला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने धक्का ‎‎दिला. तेथे प्रभाव वाढवण्यासाठी शिंदेंकडून लंघेंना बळ‎देण्याचा प्रयत्न होऊ शकतो. दुसरीकडे जायंट किलर‎ठरलेले अमोल खताळ हे देखील मंत्रिपदाच्या रेसमध्ये‎आहेत, पण त्यांची पहिलीच टर्म आहे. मागील तीस‎वर्षांपासून मंत्रीपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या‎अहिल्यानगरवासीयांना आ. संग्राम जगताप यांच्या रुपाने‎मंत्रिपद मिळून, शहर विकासाला चालना मिळेल अशी‎अपेक्षा आहे. उत्तरेतून दादांच्या राष्ट्रवादीकडून‎ पहिल्या यादीत‎ कोण घेणार शपथ‎ सरकार स्थापनेवेळी पहिल्या यादीत‎भाजपचे दहा, राष्ट्रवादी पाच,‎शिवसेनेचे पाच आमदार मंत्रिपदाची‎शपथ घेतील, अशी माहिती आहे.‎भाजपची यादी समोर आली नसली,‎तरी त्यात विखेंचा समावेश‎असल्याचे बोलले जात आहे. शिंदेंची‎शिवसेना व दादांच्या राष्ट्रवादीकडून‎कोणत्या आमदाराची वर्णी लागेल हे‎पाहणे औत्सुक्याचे आहे.‎ राजळेंच्या रूपाने महिलेला ‎संधी मिळणार का ?‎ जिल्ह्यात महायुतीला दहा जागांवर यश‎मिळाले, पक्षीय बलाबल पाहता‎भाजपकडून सलग आठव्यांदा राधाकृष्ण‎विखे, शिवाजी कर्डिले, विक्रम पाचपुते,‎मोनिका राजळे विजयी झाले. शिंदे‎सेनेकडून अमोल खताळ, विठ्ठल लंघे,‎दादांच्या राष्ट्रवादीतून आ. संग्राम‎जगताप, आशुतोष काळे, काशिनाथ‎दाते, किरण लहामटे विजयी झाले.‎त्यामुळे मंत्रिपदासाठी मोठी स्पर्धा आहे.‎ ५ वर्षांत जिल्ह्यात ५ मंत्री‎ २०१९ च्या विधानसभा‎निवडणुकीनंतर आघाडी‎सरकारच्या काळात महसूलमंत्रीपद‎बाळासाहेब थोरात, पालकमंत्रीपद‎हसन मुश्रीफांकडे होते. तर शंकर‎गडाख, प्राजक्त तनपुरे यांनाही मंत्री‎पदे होती. त्यानंतर राजकीय‎उलथापालथ होऊन, सत्तेत‎आलेल्या महायुतीच्या काळात‎एकमेव राधाकृष्ण विखे यांच्याकडे‎मंत्रिपद राहिले.‎ आशुतोष काळे दावेदार मानले जात‎असल्याने, रस्सीखेच दिसून येते.‎भाजपमध्ये विखेंच्या गळ्यात‎मंत्रिपदाची माळ पडेल, यात शंका‎नाही. पण भाजपकडून माजी मंत्री‎शिवाजी कर्डिले, पाथर्डीत हॅट्रिक‎करणाऱ्या मोनिका राजळे‎मंत्रीपदाच्या रेसमध्ये आहेत.‎कर्डिलेंच्या शुभेच्छा बॅनरवर अनेक‎ठिकाणी लाल दिव्यांची गाडी‎दाखवून मंत्रीपदावर दावा ठोकण्यात‎आला आहे. नवीन राजकीय‎समिकरणे जुळवताना, महायुती‎भक्कम करण्यासाठी नव्या दमाच्या‎आमदारांना बळ देऊ शकते,‎असाही अंदाज वर्तवला जात आहे.‎शिंदे सनेच्या सर्व आमदारांसमवेत‎कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी‎चर्चा केली आहे. त्यावेळी आ. लंघे‎यांनीही मंत्री शिंदे यांची भेट‎घेतल्याची माहिती समजली.‎

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article