आमशीतील तालीम दुरुस्तीसह विविध विकास कामांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदनfile photo
Published on
:
23 Sep 2024, 7:31 am
Updated on
:
23 Sep 2024, 7:31 am
आमशी : आमशी (ता. करवीर) येथील तालमीच्या दुरुस्तीसाठी आणि गावातील प्रलंबित विविध विकास कामांसाठी निधी देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. गावातील पैलवान आणि ग्रामपंचायतीच्या वतीने मुंबई येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले आहे.
मुख्यमंत्र्यांनी तालमीच्या व गावच्या प्रलंबित विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी सरदार सावंत, राजाराम पाटील (वस्ताद), धनाजी पाटील, दिलीप सातारे, शिवाजी शिंदे, पवन पाटील आदी. ग्रामस्थ उपस्थित होते.