आरक्षणासाठी मराठा तरुणाची आत्महत्या:वसमत तालुक्यातील मुडी येथील घटना, जरांगेंच्या ढासळल्या प्रकृतीमुळे मनाला वेदना होत असल्याची चिठ्ठी

2 hours ago 2
आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील सहा दिवसा पासून उपोषणाला बसले आहेत. त्यांची तब्येत चिंताजनक बनली असून त्यामुळे मला वेदना होत आहेत. मराठा समाजाला आबोसीतून आरक्षण मिळाले हि माझी इच्छा असून माझ्या आमहत्येसाठी सरकार जबाबदार असल्याचे चिठ्ठीत नमुद करीत मुडी (ता. वसमत) येथील तरुणाने घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी ता. २३ सकाळी उघडकिस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील मुडी येथील साईनाथ सखाराम पडोळे (२६) हा पुणे येेथे एका खाजगी कंपनीमध्ये कार्यरत होता. त्या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनात त्याने सहभाग घेतला होता. मागील आठ ते दहा दिवसांपासूून तो गावी मुडी येथे आला होता. दरम्यान, मुडी येथे घरी आई, वडिल, भाऊ असे कुटुंब आहे. रविवारी ता. २२ रात्री सर्व जण झोपले होते. साईनाथ हा एका खोलीत झोपला होता. सकाळी पाच वाजता त्याचे आई, वडिल झोपेतून उठल्या नंतर त्याला उठविण्यासाठी गेले असता त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर गावकरी घटनास्थळी एकत्र आले. वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल काचमांडे, उपनिरीक्षक संतोष मुपडे, जमादार मधुकर आडे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मयत साईनाथ याच्या खिशात चिठ्ठी आढळून आली. त्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी फाशी घेत असल्याचे नमुद केले असून माझ्या मृत्यूला सरकार जबाबदार असल्याचेही नमुद केले आहे. याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलिसांत नोंद घेण्याची प्रक्रिया सुरु होती. मयत साईनाथ याने लिहिलेली चिठ्ठी एक मराठ लाख मराठा. मी साईनाथ पडोळे मराठा आरक्षणासाठी फाशी घेत आहे. मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील सहा दिवसांपासून आमरण उपोषण करीत आहेत. त्यांची तब्येत खूप चिंताजनक बनली आहे. मला त्यामुळे खूप प्रचंड वेदना होत आहेत. सरकार जाणून बुजून मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. माझ्या मृत्यूस फक्त सरकार जबाबादार असेल. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे हि माझी इच्छा आहे. एक मराठा लाख मराठा

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article