आवताडे शुगरचे 5 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट:कारखान्याच्या तिसऱ्या गळीत हंगामाचा सभासद शेतकऱ्यांच्या हस्ते प्रारंभ

4 days ago 3
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या आवताडे शुगरने नेहमीच शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव देत शेतकऱ्यांचे समाधान केलेले आहे. यावर्षी कारखान्याने पाच लाख मॅट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे असे प्रतिपादन आवताडे शुगरचे चेअरमन संजय आवताडे यांनी केले. नंदुर (ता. मंगळवेढा) येथील आवताडे शुगर अँड डिस्टलरी प्रा. लि. या साखर कारखान्याच्या तृतीय बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभात ते बोलत होते. यावेळी मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, दामाजी कारखान्याचे माजी संचालकभारत निकम, विजय माने, बापू काकेकर, मारापुरचे सरपंच विनायक यादव आदी उपस्थित होते. गतवर्षीच्या हंगामात कारखान्यास सर्वाधिक ऊस घातलेल्यासचिन चौगुले, शामराव ढाने, दयानंद दत्तू, ज्ञानेश्वर मुकणे, माणिक इंगळे, बाळासाहेब गडदे, पांडुरंग माने, किसन आसबे या शेतकऱ्यांच्या हस्ते सपत्नीक होमहवन व सत्यनारायण महापूजा करण्यात आली. कर्मचाऱ्याना एक पगार बोनस पुढे बोलताना चेअरमन संजय आवताडे म्हणाले, अवताडे शुगर ने शेतकरीवर्ग व कर्मचाऱ्यांच्या बळावर गेल्या वर्षी ४ लाख ४ हजार मॅट्रिक टन ऊस काळात करून उच्चांक प्रस्थापित केला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या घामचा पैसा मिळावा यासाठी नेहमीच कारखान्याने जास्तीत जास्त ऊस दर दिलेला आहे यावर्षीही उसाला चांगला दर देण्याचा आपला मानस असून शेतकऱ्यांनी आवताडे शुगरलाच ऊस घालावा. कारखान्याचे यशात येथील कर्मचाऱ्यांचा आहे नेहमीच मोलाचा वाटा असल्याने कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी एक पगार बोनस देण्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article