आविष्कार स्पर्धेमध्ये साकारले रसायनशास्त्राचे विविध प्रकल्प:मुक्ताईनगर येथील खडसे महाविद्यालयाचा उपक्रम, विद्यार्थ्यांचा सहभाग

2 hours ago 1
मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा उत्साहात पार पडली. विभागाच्या वतीने एमएस्सीच्या विद्यार्थ्यांसाठी पोस्टर प्रेझेंटेशनची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेमध्ये २० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. संजीव साळवे हे होते. स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. एच. ए. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. भविष्यातील संशोधक मला या विद्यार्थ्यांमध्ये दिसतो आहे, असाही आशावाद त्यांनी या वेळेस व्यक्त केला. अविष्कार स्पर्धेत महाविद्यालयाचा संघ पाठवताना ज्या विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट प्रेझेंटेशन्स असतील त्यांना नक्कीच संधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्राचार्य डॉ. महाजन यांनी सांगितले. स्पर्धेत विजयी झालेले विद्यार्थी परीक्षक म्हणून प्रा. डॉ. आर. डी. येवले, प्रा. डॉ. संतोष थोरात यांनी काम पाहिले. परीक्षकांनी स्पर्धेचा निकाल तयार करून जाहीर केला. प्रथम क्रमांक स्वाती सुनील इंगळे, द्वितीय क्रमांक निर्मल पाटील, तृतीय क्रमांक निकिता प्रमोद पाटील यांनी मिळवला. यावेळेस विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी रसायनशास्त्र विभागातील सर्व कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article