Maratha reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

4 days ago 15

वसमत तालुक्यातील मुडी येथील घटना

हिंगोली (Maratha reservation) : वसमत तालुक्यातील मुडी येथील तरुणाने घरी गळफास घेऊन आत्महत्या (Young suicide) केल्याची घटना २३ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकिस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील मुडी येथील साईनाथ सखाराम पडोळे (२६) हा पुणे येेथे एका खाजगी कंपनीमध्ये कार्यरत होता. त्या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी झालेल्या (Maratha reservation) आंदोलनात त्याने सहभाग घेतला होता. मागील आठ ते दहा दिवसांपासूून तो गावी मुडी येथे आला होता.

दरम्यान, मुडी येथे घरी आई, वडिल, भाऊ असे कुटुंब आहे. रविवारी ता. २२ रात्री सर्व जण झोपले होते. साईनाथ हा एका खोलीत झोपला होता. सकाळी पाच वाजता त्याचे आई, वडिल झोपेतून उठल्या नंतर त्याला उठविण्यासाठी गेले असता त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या (Young suicide) प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर गावकरी घटनास्थळी एकत्र आले. वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल काचमांडे, उपनिरीक्षक संतोष मुपडे, जमादार मधुकर आडे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

मयत साईनाथ याच्या खिशात चिठ्ठी आढळून आली. त्यात (Maratha reservation) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी फाशी घेत असल्याचे नमुद केले असून माझ्या मृत्यूला सरकार जबाबदार असल्याचेही नमुद केले आहे. याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलिसांत नोंद घेण्याची प्रक्रिया सुरु होती.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article