किराणा दुकानदाराचा मुलगा ते हिजबुल्‍लाचा म्‍होरक्‍या.! कोण होता हसन नसराल्लाह?

2 hours ago 1

हिजबुल्‍लाहचा म्‍होरक्‍या हसन नसराल्लाह. (Representative image)

पुढारी वृत्तसेवा

Published on

28 Sep 2024, 11:03 am

Updated on

28 Sep 2024, 11:03 am

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल्‍लाचा म्‍होरक्‍या हसन नसराल्लाह याला ठार केल्‍याचा दावा इस्‍त्रालयने केला आहे. शुक्रवारी (दि. २७ सप्‍टेंबर) इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर जोरदार हल्ले केले. गेल्या तीन दशकांपासून लेबनॉनमधील सशस्त्र गटाचे नेतृत्व करणार्‍या हसन नसराल्लाह हा या हल्‍ल्‍यात ठार झाला आहे. जाणून घेवूया हसन नसराल्लाह याच्‍याविषयी...

नसराल्लाहचा खात्‍मा करण्‍यासाठीच हल्‍ला : इस्त्रायलची स्‍पष्‍टोक्‍ती

इस्त्रायली हवाई दलाने शुक्रवार, २७ सप्‍टेंबर रोजी लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये जोरदार हवाई हल्ले केले. यामध्‍ये हिजबुल्लाच्या मुख्यालयाचाही समावेश होता. या हवाई हल्ल्यात हसन नसराल्लाह ठार झाला. आमच्‍या हल्‍ल्‍याचे लक्ष्‍य हसन नसराल्लाह हाच होता, असे वृत्त 'द टाईम्स ऑफ इस्रायल'ने दिले आहे. इस्रायलच्या हल्ल्यात सहा इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. हिजबुल्लाह आणि इस्रायल यांच्यातील सुमारे वर्षभराच्या संघर्षात बेरूतमधील हा सर्वात मोठा हल्ला होता.

नसराल्लाह याचा जन्म १९६० मध्‍ये बेरूतमधील शारशाबूक उपनगरात शिया कुटुंबात झाला. त्‍याच्‍य वडील किराणा व्यापारी होते. धर्मशास्त्राच्‍या अभ्‍यासानंतर तो वयाच्या १५ व्या वर्षी अमल ऑर्गनायझेशन या शियाच्‍या राजकीय आणि निमलष्करी संघटनेत सहभागी झाला. १९७८ मध्‍ये इराकमध्‍ये एका चर्चासत्रात सहभागी होण्‍यासाठी गेलेल्‍या नसराल्लाह याला सद्दाम हुसेनच्या राजवटीने या चर्चासत्रात सहभागी होण्‍यास रोखले होते. येथेच त्‍याने हिजबुल्ला संघटनेचे सह-संस्थापक अब्बास अल-मुसावी याची भेट घेतली. या भेटीनंतर १९८२ मध्‍ये तो हिजबुल्लामध्ये सहभागी झाला. इराणी रिव्होल्युशनरी गार्डने हिजबुल्लाची स्थापना केली होती. त्‍यामुळेच हिजबुल्लाह संघटनेची ओळखच इराण-समर्थित गट अशी आहे.

१९९२ मध्‍ये हिजबुल्‍लाहचे नेतृत्त्‍व

१९९२ मध्‍ये हिजबुल्लाचा तत्‍कालीन म्‍होरक्‍या सय्यद अब्बास मौसावीचा हेलिकॉप्टर अपघतात मृत्‍यू झाला. इस्‍त्रायलने हा अपघात घडविल्‍याचा आरोप त्‍यावेळी झाला होता. मौसावीच्‍या मृत्‍यूनंतर हिजबुल्ला संघटनेकडे महत्त्‍वाचे पद हसन नसराल्लाहकडे आले. यानंतर पाच वर्षांनी अमेरिकेने हिजबुल्लाला दहशतवादी संघटना घोषित केले. १९९७ मध्ये हसन नसराल्लाह याचा मोठा मुलगा हादी हा इस्रायली सैन्याविरुद्धच्या लढाईत ठार झाला.

द. लेबनॉनमधून इस्रायलची माघार, लेबनॉनमध्‍ये नसराल्लाहचा बाेलबाला

हसन नसराल्लाहच्‍या नेतृत्वाखाली हिजबुल्ला २००० मध्ये दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायली सैन्यासोबत युद्ध केले होते. या युद्धानंतर तब्‍बल १८ वर्षांच्या ताब्यानंतर दक्षिण लेबनॉनमधून इस्रायली सैन्याने माघार घेतली होते. दक्षिण लेबनॉनमधून इस्रायलने माघार घेतल्यानंतर नसराल्लाह लेबनॉन आणि संपूर्ण अरब जगतात प्रसिद्ध झाला. 2006 मध्ये हिजबुल्लाहने इस्रायलशी ३४ दिवसांचे युद्ध झाले. या युद्धात 1,000 हून अधिक हिजबुल्लाचे दहशतवादी आणि 150 इस्रायली मारले गेले. २०११ मध्ये सीरियामध्ये गृहयुद्ध सुरू झाले तेव्हा हिजबुल्लाने असदच्या सैन्याचे समर्थन केले हाेते.

हिजबुल्लास इस्रायलचा कट्टर शत्रू बनवले

हसन नसराल्लाह याच्‍या नेतृत्वाखाली हिजबुल्लाहने इस्रायलविरुद्ध अनेक युद्धे केली. त्‍याने शेजारच्या सीरियामधील संघर्षातही भाग घेतला. राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांचे समर्थन केले. नसराल्लाहने हिजबुल्लाला इस्रायलचा अधिक कट्टर शत्रू बनवले. तर इराणमधील शिया धर्मगुरु नेत्यांशी आणि पॅलेस्‍टिनी दहशतवादी संघटना हमासबरोबर युती केली. नसराल्लाह हा लेबनॉनमध्‍ये शिया अनुयायांमध्ये लोकप्रिय होता. अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी नसराल्लाह याला दशतवादी घोषित केले होते. ७ ऑक्‍टोबर २०२३ रोजी हमासने इस्‍त्रायलवर हल्‍ला केला. यामध्‍ये १२०० नागरिक ठार झाले. इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी हिजबुल्लाहने सीमेवरील इस्रायली लष्करी चौक्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली हाेती. हमासच्या समर्थनार्थ हिजबुल्लाह मागील वर्षभरापासून उत्तर इस्रायलमध्ये हवाई हल्ले करत आहे. गाझामध्ये युद्धविराम होईपर्यंत हिजबुल्लाह इस्रायलवरील हल्ले थांबवणार नाही, असा इशाराही हसन नसराल्लाह याने दिला होता.

इस्‍त्रायलच्‍या कारवाईने द. आशियात तणाव वाढण्याची भीती

हसन नसरल्लाहच्या हत्येनंतर दक्षिण आशियात तणाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍त्‍यांनी म्‍हटलं आहे की, इस्रायल संपूर्ण जगासाठी धोका आहे. पॅलेस्टाईन आणि लेबनॉनमध्ये इस्रायलचे भयंकर गुन्हे सुरु आहेत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद निष्क्रिय आहे. अमेरिका इस्रायलला लष्करी, राजकीय आणि आर्थिक मदत करत असल्‍याचा आरोपही त्‍यांनी केला. नसराल्लाह यांच्या मृत्यूनंतर इस्रायली लष्कराचे (आयडीएफ) चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल हर्जाई हालेवी यांनी प्रसिद्‍ध केलेल्‍या निवेदनात म्‍हटलं आहे की, जो कोणी इस्रायली नागरिकांना धमकावतो, त्यांच्यापर्यंत कसे पोहोचायचे हे आम्हाला माहित आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article