Parbhani Case: मासिक ग्रामसभेत सरपंच पतीला मारहाण; दगडवाडी येथील घटना

2 hours ago 1

परभणी/गंगाखेड(Parbhani):- ग्राम पंचायत कार्यालय परिसरात आयोजीत मासिक ग्रामसभेत सभा सुरू होण्या पूर्वीच सरपंच महिलेला शिवीगाळ करून तिच्या पतीला मारहाण (Beating)केल्याची घटना पुर्णा तालुक्यातील दगडवाडी येथे शुक्रवारी घडली आहे. याप्रकरणी शुक्रवार २७ सप्टेंबर रोजी रात्री उशिराने गंगाखेड पोलीस ठाण्यात माजी सरपंचासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगाखेड पोलीस ठाण्यात माजी सरपंचासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दगडवाडी ता. पुर्णा येथील ग्राम पंचायत कार्यालय परिसरात दि. २७ सप्टेंबर शुक्रवार रोजी सकाळी १० वाजता मासिक ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सरपंच सौ. गंगासागर मुंजाजी वाघमारे, ग्रामसेवक तुकाराम पवार, ग्राम पंचायत सदस्य मनोहर वाघमारे, प्रल्हाद धोत्रे, माजी सरपंच बालाजी वाघमारे, संतोष वाघमारे, संदिप वाघमारे, जायकोबा मलांडे आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती. यावेळी माजी सरपंच बालाजी निवृत्ती वाघमारे, संतोष निवृत्ती वाघमारे, संदिप निवृत्ती वाघमारे व जायकोबा सटवाजी मलांडे सर्व रा. दगडवाडी ता. पुर्णा यांनी मासिक ग्रामसभा सुरू होण्यापूर्वीच मासीक ग्रामसभा घ्यायची नाही, गावात कामे करायची नाहीत.

शिवीगाळ करून चापट बुक्याने मारहाण

आम्ही कुठले ही काम करु देणार नाही असे म्हणुन फिर्यादी मुंजाजी वाघमारे यांच्या पत्नी सरपंच सौ. गंगासागर वाघमारे यांना शिवीगाळ केली तेव्हा तुम्ही माझ्या पत्नीला शिवीगाळ का करता असे सरपंच पती मुंजाजी वाघमारे यांनी म्हणताच माजी सरपंच बालाजी वाघमारे, संतोष वाघमारे, संदिप वाघमारे व ग्रा. प. सदस्य जायकोबा मलांडे यांनी त्यांना पण शिवीगाळ करून चापट बुक्याने मारहाण केली व बालाजी वाघमारे यांनी कंबरेच्या बेल्टने डाव्या हाताचे दंडावर व उजव्या डोळ्याला मारुन दुखापत केली असल्याची फिर्याद सरपंच पती मुंजाजी मारोतराव वाघमारे वय ३८ वर्षे रा. दगडवाडी ता. पुर्णा यांनी दिल्यावरून गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याचा पुढील तपास पोह दिपककुमार वाव्हुळे हे करीत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article