लाडक्या बहिणींना लाच देण्यासाठी निवडणूक पुढे ढकलली:खासदार प्रणिती शिंदे यांचा सरकारवर गंभीर आरोप

2 hours ago 1
राज्य सरकारची महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधीच योजना आणल्याने विरोधकांकडून या योजनेवरून सरकारवर टीका होत आहे. अशात निवडणुकीच्या तोंडावर योजना आणली असून लाडक्या बहिणींना टेबलाखालून लाच देण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. यावेळी बोलताना प्रणिती शिंदे यांनी सोलापूर विमानतळाच्या मुद्यावरून भाजप तसेच महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. सोलपुरात विमानतळ आहेच, विमानसेवा कधी सुरू करणार, असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला आहे. सोलापूर विमानतळाचे उद्घाटन याआधीच झाले आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसाला 36 विमान लँड झाले होते. सोलापूरमध्ये विमानतळ आहेच. आम्ही विमानसेवेची मागणी करत आहोत. लोकांना आणखी किती फसवणार आहात. विमानसेवा कधी सुरू करणार हे सांगा, असा सवाल सरकारला केला आहे. पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, सोलापूरच्या विमानतळावरून नाईट लॅंडींग होत नाही आणि संध्याकाळीच सोलापूर विमानतळाचे उद्घाटन ठेवले होते. लोकांना आणखी किती फसवणार आहात. विमानसेवा सुरू झाल्याशिवाय आयटी कंपनी इथे येणार नाहीत. भाजपवर निशाणा साधतान प्रणिती शिंदे म्हणाल्या, भाजपचे काही लोक दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे त्यांच्या वक्तव्यातून दिसून येत आहे. बदलापूर एन्काऊंटरवरून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा गोष्टींचे समर्थन भाजपच्या नेत्यांकडून होत आहे, हे अतिशय निंदनीय असल्याचे प्रणिती शिंदे म्हणाल्या. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारला इशारा दिला आहे. योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता दिल्यानंतर जानेवारीत सरकारी कर्मचाऱ्यांना पगार द्यायला सरकारच्या तिजोरीत खडखडात असेल, असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याला प्रणिती शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे समर्थन दिले आहे. राज्यासाठी काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारकडे पैसे नसतील यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कोणती असू शकत नाही, असे त्या यावेळी म्हणाल्या.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article