देवेंद्र फडणवीसांचे कौतुक, ठाकरे-पवारांवर साधला निशाणा:अमृता फडणवीस नागपुरात काय बोलल्या?

2 hours ago 1
नागपूर येथे बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महायुती सरकारचे विशेषतः भाजप पक्षाचे तोंडभरून कौतुक केले. लाडकी बहीण योजना एकदम हिट झालेली योजना आहे, हे तुमच्या चेहऱ्यावरील आनंदाने दिसत आहे. नागपुरात मोठा विकास झाल्याने आज नागपूरमध्ये अनेकांना येण्याची इच्छा असल्याचे अमृता फडणवीस म्हणाल्या. देवेंद्र फडणवीसांचे कौतुक देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, मोठा नेता माझ कुटुंब माझी जबाबदारी म्हणू शकत नाही, त्यामुळे मी कुटुंबाची जबाबदारी सांभाळली आहे आणि ते जनतेची कामे करतात. माझं कुटुंब माझी जबाबदारी असे स्रिया म्हणू शकतात. पण माझं कुटुंबच माझी जबाबदारी हे एक मोठा नेता म्हणत असेल तर अडचण आहे, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच देवेंद्रजींनी महाराष्ट्रात आणि नरेंद्र मोदींनी केंद्रात काम केले असल्याचे अमृता फडणवीस म्हणाल्या. शरद पवारांना टोला अमृता फडणवीस म्हणाल्या, कोणी असा नेता निवडून आणणार नाही ज्यांना आपले घर भरायचे आहे. ज्यांना मुलीला सीएम करायचे आहे, पॉवरमध्ये ठेवायचे आहे असे लोक तुमच्या मदतीला येणार नाहीत. लोकांना पुढे न्यायचे आहे असे उमेदवार नेते निवडून आले पाहिजे असाही टोला यावेळी शरद पवार यांचे नाव न घेता त्यांनी लगावला. विरोधक लाडक्या बहीणींचे सावत्र भाऊ महायुती आणि भाजपा सत्तेत येईल. विरोधकांचे काम टीका करणे हेच आहे. त्यामध्ये काही नवीन नाही किंवा नवल नाही. विरोधक लाडक्या बहिणींचे सावत्र भाऊ बनत आहेत. त्यांनी बनायला नको. बहिणींचे चांगले होत आहे. आर्थिकदृष्ट्या त्यांना गरज आहे. कोर्ट केसेस करु नयेत, अडथळा आणू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. मी खूप फिरत आहे, स्त्रीयांचा खूप प्रतिसाद आहे. मी देवाच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की, जे महाराष्ट्राच्या जनतेसाठी चांगलं आहे ते व्हाव. महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळावं. देवेंद्रजी लोकांच्या संपर्कात सदैव असतात. आता सुद्धा त्यांचे दौरे वाढले आहेत. त्यामुळे मी कार्यकर्त्यांना भेटत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article