पुणे मेट्रोच्या 33 किमीच्या टप्पा एकचे काम पूर्ण:जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्थानकाच्या भुयारी मार्गाचे PM मोदी करणार उद्घाटन

2 hours ago 1
पुणे मेट्रोच्या टप्पा १ ज्यामध्ये पीसीएमसी ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी या दोन मार्गिका आहेत. यापैकी जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या अंतिम भूमिगत मार्गाचे काम नुकतेच पूर्ण झाले असून त्याचे उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 29 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12:30 वाजता दूरदृष्य प्रणालीद्वारे होणार आहे. या मार्गिकेमुळे पुण्यातील दाट लोकवस्ती असणारा कसबा पेठ, बुधवार पेठ, मंडई, स्वारगेट हा भाग मेट्रो नेटवर्कने जोडला जाणार आहे. उद्घाटन झाल्यानंतर दुपारी 4 वाजता या मार्गावर प्रवासी सेवा सुरू होणार आहे. तदनंतर थेट पीसीएमसी ते स्वारगेट हा प्रवास या मार्गावर करणे शक्य होणार आहे. पीसीएमसी ते स्वारगेट या प्रवासासाठी 34 मिनिटे वेळ जाणार असून त्यासाठी 35 रुपये भाडे असणार आहे. वनाझ ते रामवाडी या मार्गावरील प्रवासी जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक येथे इंटरचेंज करून स्वारगेट किंवा पीसीएमसी या दिशेने प्रवास करू शकतात. या मार्गीकेतील बुधवारपेठ-कसबापेठ हे स्थानक लाल महाल, शनिवार वाडा, कसबा गणपती, इलेक्ट्रिक मार्केट, यांच्या जवळ असून त्यामुळे येथे भेट देणाऱ्या लोकांना मोठ्याप्रमाणावर फायदा होणार आहे. तसेच मंडई स्थानक अत्यंत मध्यवर्ती भागात असून महात्मा फुले मंडई, तांबट आळी, तुळशीबाग, भांडी मार्केट, दगडूशेठ गणपती मंदिर अशा ठिकाणी प्रवाशांना जाणे सहज शक्य होणार आहे. या भागात प्रचंड वाहतूक कोंडी असल्याने तेथे लोक जाण्याचे टाळत होते परंतु आता मेट्रो पोहोचल्यामुळे या भागातील व्यापार उदीम यांना मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. स्वारगेट मेट्रो स्थानक हे एसटी स्थानक आणि पीएमपीएमएल बस डेपो यांच्या जवळच बांधण्यात आले आहे. त्यामुळे येथे मल्टी मॉडेल इंटिग्रेशन हब तयार झाले आहे. एसटी तथा पीएमपीएल बसने आलेले प्रवासी शहराच्या दूरवरती भागांना जसे की पीसीएमसी, रामवाडी, वनाझ येथे सहज जाऊ शकतील शहरातील विविध भागातील लोकांना स्वारगेट येथे जाऊन एसटी बाबत घेणे विनासयास शक्य होणार आहे. स्वारगेट मेट्रो स्थानक ते एसटी स्थानक हे लवकरच भूमिगत पादचारी मार्गाने जोडले जाणार आहे, त्यामुळे प्रवाशांना रस्ता ओलांडण्याची गरज पडणार नाही. उद्या दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता गणेश क्रीडा मंदिर येथे या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात होणार असून दुपारी १२.३० ते १.०५ या दरम्यान माननीय पंतप्रधान दूरदृष्य प्रणालीद्वारे याचे उद्घाटन करणार आहेत. याच कार्यक्रमात स्वारगेट ते कात्रज या नवीन दक्षिण विस्तारित मार्गीकेचे भूमिपूजन देखील होणार आहे. या मार्गिकेची लांबी ५.४६ किमी असुन या मार्गिकेचा एकूण खर्च २९५५ कोटी आहे. या मार्गिकेवर मार्केट यार्ड, पद्मावती, बालाजी नगर आणि कात्रज हि ४ स्थानके आहेत. या मार्गामुळे पद्मावती, बालाजी नगर, धनकवडी, कात्रज हे भाग मेट्रोद्वारे जोडले जाणार आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article