Published on
:
28 Sep 2024, 6:01 pm
Updated on
:
28 Sep 2024, 6:01 pm
नवी दिल्ली : कर्नाटकातील कथित ‘मुडा’ घोटाळा प्रकरणाशी संबंधित आरोप प्रथम काँग्रेसनेच केले होते, असा दावा भाजपने शनिवारी केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी भ्रष्ट नेत्यांना पाठबळ देत आहेत का, असा सवालही भाजपचे प्रवक्ते आणि खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषद घेऊन केला.
ते म्हणाले की, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कुटुंबाने म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अॅथॉरिटीमध्ये जमीन आणि सरकारी अधिकाराचा गैरवापर करून ज्या प्रकारे प्रचंड संपत्ती कमावली आहे. त्यावर न्यायालयाने निर्णय दिला आहे. सिद्धरामय्या यांना आरोपी करण्यात आले आहे. यात मुख्यमंत्री हे पहिले आणि मुख्य आरोपी आहेत का, याची चौकशी कोणत्याही केंद्रीय संस्थेने केलेली नाही आणि कोणीही स्वत:हून अर्ज दाखल केलेला नाही, असे त्रिवेदी यांनी सांगितले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हेदेखील कर्नाटकचेच आहेत. जेव्हापासून ते या पदावर आहेत, तेव्हापासून कर्नाटकातील भ्रष्टाचार दुपटीने वाढला असल्याचा आरोप त्रिवेदी यांनी केला.