चंद्रपूर : कोरपण्याचे तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित

3 hours ago 2
पुढारी वृत्तसेवा

Published on

28 Sep 2024, 8:17 pm

चंद्रपूर : कोरपना तालूक्यातील कढोली खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह दोन सदस्य अपात्र झाल्यानंतर त्यांच्या अपिलाची मुदत संपण्याआधीच सभा घेऊन नवीन निवडणुकीची निवड केल्यामुळे अनियमितता केल्याप्रकरणी कोरपनाचे तहसीलदार प्रकाश व्हटकर यांना निलंबित करण्यात आले.

उपसरपंच डॉ. विनायक डोहे यांनी कोरपना तहसीलदार यांनी घेतलेली सरपंच निवड सभा रद्द करून तहसीलदारांना निलंबित करण्याची मागणी केली होती. या प्रकरणाची दखल घेऊन राज्य शासनाने तहसीलदार व्हटकर यांना शुक्रवारी (दि.२७) निलंबित केले. महसुल व वनविभागाचे अवर सचिव यांचे आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत.

कोरपना तालुक्यातील कढोली खुर्द ग्राम पंचायतच्या सरपंच निर्मला कवडू मरस्कोल्हे आणि सदस्य सीताबाई पंधरे यांचे सदस्यत्व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या आदेशानुसार १२ ऑगस्ट २०२४ रोजी रद्द करण्यात आले होते. त्यांनी सदस्य रद्दच्या आदेशाविरुद्ध विभागीय आयुक्त, नागपूर यांच्याकडे दाद मागीतली होती. त्यांच्या अर्जावर २६ ऑगस्ट रोजी नागपूर येथे सुनावणीचे पत्र तहसीलदार प्रकाश व्हटकर यांना बजावण्यात आले होते. तहसीलदार व्हटकर यांनी १९ ऑगस्टला दिलेल्या आदेशानुसार सरपंच निवडीकरिता २६ ऑगस्टला सभा घेतली आणि काँग्रेस समर्थित उमाजी आत्राम यांची सरपंचपदी निवड केली. अपिलाची मुदत १५ दिवस म्हणजे २७ ऑगस्टपर्यंत असताना ती संपण्याच्या आधीच सरपंच निवडणुकीचा कार्यक्रम आखून सरपंचाची नियुक्ती आर्थिक गैरव्यवहारातून केल्याचा आरोप करून उपसरपंच डॉ. विनायक विठ्ठलराव डोहे यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह राज्यशासनाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत महसुल व वनविभागाचे अवर सचिव संजीव राणे यांनी निवडणूकीची कार्यवाही करून गंभीर अनिमितता केल्याचा ठपका ठेवून कोरपण्याचे तहसीलदार प्रकाश व्हटकर यांना निलंबित करण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article