IPL 2025 : इतके खेळाडू रिटेन करता येणार, 18 व्या मोसमाआधी ऑक्शनसाठी नियमावली जाहीर

3 hours ago 2

आयपीएलचा 18 वा हंगामा मार्च 2025 मध्ये खेळवण्यात येणार आहे. त्याआधी या हंगामासाठी मेगा ऑक्शन होणार आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने या मेगा ऑकशन्साठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार मेगा ऑक्शनआधी प्रत्येक संघ 6 खेळाडूंना रिटेन करु शकतो. तसेच ‘राईट टु मॅच’ अर्थात ‘आरटीएम कार्ड’ हा नियम पुन्हा एकदा आणला गेला आहे. फ्रँचायजींना या नियमामुळे प्रमुख खेळाडूंना संघात कायम राखण्यात मदत होणार आहे. तसेच इमपॅक्ट प्लेअर नियमाची अंमलबजावणी 2027 पर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएल या एक्स प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

नियमांनुसार, एक टीम जास्तीत जास्त 6 खेळाडू कायम ठेवू शकते, ज्यामध्ये आरटीएमचा समावेश आहे. तसेच एखाद्या संघाने 5 खेळाडू रिटेन केले, तर त्यांना ऑक्शनमध्ये 1 आरटीएमचा वापर करता येईल. तसेच 6 खेळाडू रिटेन केल्यावर संघाला 5 कॅप्ड प्लेअर रिटेन करावे लागतील, तर एका अनकॅप्ड खेळाडूचाही समावेश करावा लागेल.

पर्समध्ये 20 कोटींची वाढ

यंदा मेगा ऑक्शन होणार आहे. त्यामुळे बीसीसीआयने सर्व फ्रँचायजींना ऑक्शनमधून खेळाडू घेण्यासाठी 20 कोटी रुपयांची वाढ दिली आहे. त्यामुळे फ्रँचायजींना 100 ऐवजी 120 कोटी रुपये ऑक्शनसाठी मिळणार आहेत. मात्र यातूनच रिटेन केलेल्या खेळाडूंना दिलेली रक्कम वजा केली जाणार आहे. उदाहरण एका संघाने 5 खेळाडू रिटेन केले, तर 120 कोटींमधून 75 कोटी रुपये वजा केले जातील. ज्यामुळे त्या फ्रँचायजीसमोर उर्वरित 45 कोटींमध्येच खेळाडू घेण्याचं आव्हान असेल. नियमांनुसार, एक टीम जास्तीत जास्त 25 खेळाडू घेऊ शकते.

विदेशी खेळाडूंबाबत कडक नियम

आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीत विदेशी खेळाडूंच्या रिटेन्शन पॉलिसीबाबत एका नियमाची घोषणा करण्यात आली आहे. नियमानुसार, एका खेळाडूने आगामी ऑक्शनसाठी नाव नोंदवलं नसेल, तर त्याला पुढील ऑक्शनसाठीही नोंदणी करता येणार नाही.

अनेक खेळाडू हे राष्ट्रीय संघाकडून खेळण्यासाठी ऐन क्षणी आयपीएलमध्ये खेळण्यास नकार देतात. आता या अशा प्रकाराला रोखण्यासाठी नियम करण्यात आला आहे. ऑक्शनमध्ये सोल्ड झालेल्या खेळाडूने खेळण्यास नकार दिला, तर त्याच्यावर 2 वर्ष बंदी घालण्यात येणार आहे. तसेच ऑक्शनमध्येही नाव नोंदणी करता येणार नाही.

असे आहेत नियम

NEWS 🚨 – IPL Governing Council announces TATA IPL Player Regulations 2025-27.

READ – https://t.co/3XIu1RaYns #TATAIPL pic.twitter.com/XUFkjKqWed

— IndianPremierLeague (@IPL) September 28, 2024

आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने एक जु्ना नियम पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नियमानुसार, भारतीय खेळाडूने 5 वर्षात आंतरराष्ट्रीय सामना खेळला नसेल, तर त्याची अनकॅप्ड खेळाडू म्हणून गणना केली जाईल.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article