EVM नव्हतं म्हणूनच ABVP चा सुफडासाफ’, संजय राऊत यांची बोचरी टीका

3 hours ago 1

बहुचर्चित आणि वादात राहिलेल्या मुंबई विद्यापीठ सिनेटच्या विजयानंतर मातोश्रीवर जल्लोष झाला, घोषणाबाजी केली. दरम्यान, पदवीधर निवडणुकीनंतर पदवीधरांनी सरकारला धडा शिकवल्याचा दावा करत संजय राऊतांनी सिनेट निवडणुकीवरुन सरकारला लक्ष्य केलं. भाजपच्या अभाविप अर्थात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सुफडासाफ करत ठाकरे गटाच्या युवासेनेनं दहाच्या दहा जागांवर विजय मिळवला. निकालात भाजपच्या अभाविपचे उमेदवार विजयी मतांच्या जवळपास सुद्धा पोहोचू शकले नाहीत. राखीव प्रवर्गातल्या 5 जागांवर ठाकरे गटाच्या युवासेनेच्या एका उमेदवाराला जितकी मतं पडली., तितकी मतं पाचही उमेदवार एकत्रित करुनही अभाविप मिळवू शकलं नाही.

  • महिला प्रवर्गात ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या स्नेह गवळींना 5914 मतं पडली. अभाविपच्या रेणुका ठाकुरांना अवघी 893 मतं मिळाली.
  • ओबीसीत युवासेनेच्या मयूर पांचाळांना 5350, तर विरोधातल्या राकेश भुजबळांना फक्त 888 मते मिळाली.
  • एसटीत युवा सेनेच्या धनराज कोहचाडेंना 5247 मते, भाजपचे माजी मंत्री विष्णु सावरांच्या कन्या आणि अभाविपच्या उमेदवार निशा सावरांना अवघी 924 मतं पडली.
  • एससी कोट्यात युवासेनेच्या शीतल देवरुखकरांना 5489 मते तर अभाविपच्या राजेंद्र सायगावकरांना 1014 मते मिळाली
  • व्हीजेएनटी प्रवर्गातून युवासेनेच्या शशिकांत झोरेंना 5247 मते, तर तर अभाविपचे अजिंक्य यादव फक्त 1066 मतं मिळवून पराभूत झाले.

युवासेनेच्या पाचही उमेदवारांना एकूण 27,247 मतं पडली. तर अभाविपच्या एकूण उमेदवार फक्त 4,785 मतं मिळू शकले. धक्कादायक म्हणजे यापैकी युवासेनेच्या एका उमेदवाराला जितकी मतं गेली. तितकी मतं अभाविपचे पाचही उमेदवार मिळूनही होऊ शकले नाहीत.

प्रवर्गाप्रमाणेच खुल्या गटातही अभाविप उमेदवारांचा दारुण पराभव झाला.

युवासेनेचे उमेदवार

प्रदीप सावंत – 1338 मिलिंद साटम – 1246 अल्पेश भोईर – 1137 परामात्मा यादव – 1064 किसन सावंत – 960

अभाविपचे उमेदवार

हर्षद भिडे – 345 प्रतीक नाईक – 176 रोहन ठाकरे – 782 प्रेषित जयवंत – 134 जयेश शेखावत- 65

सिनेटचा मराठी अर्थ अधिसभा असा होता., ज्याप्रमाणे विधीमंडळात विधानसभा असते., तिथं कायदे-धोरणं ठरवली जातात. तसेच विद्यापीठाच्या अधिसभेत अर्थात सिनेटमधले लोक विद्यापीठाची फी, धोरणांसह विविध निर्णय घेतात.

याआधी 2018 ला मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक झाली होती. ज्यात पदवीधरांकडून निवडून गेलेल्या १० पैकी १० जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय झाला होता. ही निवडणूक ऑगस्ट 2022 ला होणं अपेक्षित होतं. मात्र सरकारनं ती निवडणूक पुढे ढकलली. तब्बल दीड वर्षांनी म्हणजे मार्च-फेब्रुवारी 2024 ला निवडणूक घेण्याचं सांगितलं गेलं. त्यादरम्यान ठाकरे गटानं उमेदवारी न दिलेले 3 जणांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावरुन फोडाफोडीचा आरोपही रंगला होता. मात्र मार्च-फेब्रुवारी 2024 ची तारीख पुन्हा लांबणीवर टाकण्यात आली. पुढे ऑगस्ट 2024 ला परिपत्रक काढण्यात आलं की सप्टेंबरमध्ये निवडणुका घेतल्या जातील.

पण पुन्हा ३ दिवस असतानाच निवडणूक लांबणीवर टाकली गेली. याविरोधात ठाकरे गटानं हायकोर्टात धाव घेतल्यानंतर निवडणुकीचे आदेश दिले गेले. त्यावर सुप्रीम कोर्टातही धाव घेतली गेली, पण कोर्टानं हायकोर्टाचाच निकाल कायम ठेवला. आता दहाच्या दहा जागांवरच्या विजयानंतर शिवसेना ठाकरे गटाचा आत्मविश्वास दुणावला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article