अमरावती मनपा तिसऱ्यांदा विभागात प्रथम:1.5 कोटीचे बक्षीस, माझी वसुंधरा अभियानत उत्कृष्ट कामगिरी

3 hours ago 1
पृथ्‍वी, वायू, जल, अग्‍नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्‍वांवर आधारित ‘माझी वसुंधरा अभियान’मध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल अमरावती महानगरपालिकेला १ कोटी ५० लाख रुपयांचे बक्षीस घोषित झाले आहे. विशेष म्हणजे असे बक्षीस मिळवण्याची अमरावती महापालिकेची ही तिसरी वेळ आहे. एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या बारा महिन्याच्या कालावधीत राबविण्यात आलेले स्वच्छताविषयक उपक्रम आणि प्रत्यक्ष कृती यावर आधारित हे बक्षीस आहे. त्यासाठी अमरावती महापालिकेला या विभागातील अकोला महापालिकेशी स्पर्धा करावी लागली. घनकचरा व्यवस्थापन, सौर उर्जेच्या जाळ्याचा विस्तार, वायू प्रदुषण कमी करण्यात अमरावतीचे स्थान, प्लॅस्टिक निर्मूलन आदी विषयांच्या अनुषंगाने केलेली कामे आदी बाबीसुद्धा या पुरस्कारासाठी उपयुक्त झाल्या. ‘माझी वसुंधरा अभियानात अमरावती महानगरपालिका अगदी पहिल्या वर्षापासून सहभागी होत आहे. पहिल्या वर्षी काही मुद्दे कमी असल्यामुळे स्पर्धेत सहभागी होता आले नाही. मात्र दुसऱ्या वर्षापासून सलग तिसऱ्यांदा अमरावतीने हा पुरस्कार मिळवला आहे. त्या अर्थाने अमरावती महापालिकेची हॅट्रीक झाली आहे. या पुरस्काराबद्दल मनपा आयुक्‍त तथा प्रशासक सचिन कलंत्रे यांनी सर्व अधिकारी, कर्मचा-यांच्‍या परिश्रमांचे कौतुक केले आहे. अमरावती महानगरपालिकेला केंद्र शासन व राज्‍य शासनाचे बरेच पुरस्‍कार प्राप्‍त होत आहे. हा तर अमरावतीकरांचा सन्मान अमरावती महापालिकेला दीड कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले, याचा आयुक्त तथा प्रशासक म्हणून मला खूप अभिमान आहेच. परंतु हा पुरस्कार माझा नसून पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतलेले परिश्रम आणि त्याला अमरावतीकरांनी केलेले सहकार्य, याचे फलीत आहे. त्यामुळे हा खऱ्या अर्थाने अमरावतीकरांचा सन्मान असून तो मी त्यांना अर्पण करतो, असे महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article