मोहन भागवतांचा दावा अजित पवारांनी खोडला:शिवरायांची समाधी महात्मा फुलेंनीच शोधली, हे मी मनाचे सांगत नाही

2 hours ago 1
नाशिक येथे मुंबई चौक, सावित्रीबाई फुले चौकात क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योत सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे लोकार्पण सोहळा पार पडला. या प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांच्या वक्तव्याला खोडून काढले आहे. महात्मा फुले यांनीच पुणे ते रायगड पायी चालत जाऊन पाला-पाचोळ्यात असलेली शिवरायांची समाधी शोधून काढली, असे अजित पवारांनी सांगितले. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, महात्मा फुले यांनी पुणे ते महात्मा फुले यांनीच पुणे ते रायगड पायी चालत जाऊन पाला-पाचोळ्यात असलेली शिवरायांची समाधी शोधून काढली, हे मी मनाचे सांगत नाही याचे कागदपत्रे आहेत. त्यांनी समाधीची साफसफाई करून फुले वाहिली, हे सगळे कागदपात्रांमध्ये आहे. त्यावरूनच मी बोलतोय. पुढे महात्मा फुले यांनी पुण्यात शिवछत्रपतींचा सोहळा सुरू केला, असे अजित पवारांनी सांगितले. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळावे अशी जन भावना आहेत. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहे. त्यांच्याकडे मुख्यमंत्री आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री यासंबंधीची मागणी करणार असल्याचे अजित पवारांनी यावेळी सांगितले. एवढा मोठा अर्धाकृती पुतळा मी महाराष्ट्रात नाही पाहिला. या स्मारकामुळे नाशिकच्या लौकिकात भर पडली आहे. शिवछत्रपती-फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांनी आपण राज्य चालवतो. महापुरुषांचे विचार घेऊनच राज्यात निर्णय घेतले जातात, असेही अजित पवार म्हणाले. मोहन भागवत काय म्हणाले होते? पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देताना मोहन भागवत म्हणाले, इंग्रजांच्याविरुद्ध लढतानासुद्धा शिवाजी महाराज इथेच येऊन गेले. इथे सुद्धा त्यांचे स्मरण व्हावे म्हणून जागरण केले. रायगडावर उत्सव सुरू केला. लोकमान्य टिळकांनी रायगडावरील समाधी शोधून काढली. रवींद्रनाथ टागोर यांनी देखील शिवाजी महाराजांवर कविता लिहिल्या आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article