Chandrapur: खुर्द ग्रामपंचायत सरपंच निवड प्रकरण भोवले; कोरपना तहसीलदार निलंबीत..!

2 hours ago 1

Chandrapur:- कोरपना तालुक्यातील कढोली खुर्द ग्रामपंचायतच्या तत्कालीन सरपंचा निर्मला मरस्कोल्हे यांच्या विरोधात गैरव्यवहारची तक्रार दाखल करण्यात आल्याने व ते सिद्ध झाल्याने निर्मला मरस्कोल्हे यांना सरपंच पदावरून पाय उतार करण्यात आले होते. सरपंचासह सीता पंधरे यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. पद अपात्र झाल्यानंतर त्यांच्या अपिलाची १५ दिवसांची मुदत असताना त्यापूर्वी सरपंच पदाची निवड सभा घेऊन नवीन सरपंच निवड करण्यात आली होती. त्यामुळे उपसरपंच डॉ. विनायक डोहे यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार (Guardian Minister Sudhir Mungantiwar) यांना पत्र देऊन सरपंच निवड सभा रद्द करावी तसेच कोरपणा तहसीलदार प्रकाश व्हटकर यांना त्वरित निलंबित करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती.

कोरपणा तहसीलदार प्रकाश व्हटकर यांना त्वरित निलंबित करावे

शासनाने दखल घेत निलंबणाचे आदेश काढले असून तहसीदार प्रकाश व्हटकर यांना सरपंच निवड सभा प्रकरण चांगलेच भोवले असल्याचे बोलले जात असून तहसीलदार कोरपना प्रकाश व्हटकर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा सिस्त अपील नियम १९७९ अन्वये विभागीय चौकशीची कार्यवाही करण्याचे योजिले असून च्या नियम १९७९च्या नियम ४ (१) अ अन्वये आदेशाच्या दिनांकपासून शासन सेवेतुन निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश काढण्यात आले. उच्च पदाच्या (high rank) अधिकाऱ्याचे निलंबणाचे आदेश धडकल्याने तहसील कार्यालयातील कामचुकार अधिकऱ्यांचे धाबे चांगलेच दनाणले आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article