छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात:गाडी थेट पार्किंगमध्ये घुसली, 8 ते 10 गाड्यांचे नुकसान तर चौघे जखमी

2 hours ago 1
छत्रपती संभाजीनगर येथील निराला बाजार येथे भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. निराला बाजार परिसरात असलेल्या पार्किंगमध्ये एक चारचाकी गाडी सरळ घुसल्याने हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र यात 8 ते 10 दुचाकी तसेच एका चारचाकी वाहनाचे नुकसान झाले आहे. या अपघातात चौघे जखमी झाले आहेत. निराला बाजार येथील पार्किंगच्या ठिकाणी येणाऱ्या एका चारचाकी गाडीवरचा चालकाकडून ताबा सुटल्याने गाडी थेट पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकींवर धडकली आहे. यात जवळपास 8 ते 10 दुचाकी वाहनांचे नुकसान झाले असून एका चारचाकीला देखील धडक बसल्याने समोरच्या बाजूने नुकसान झाले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यात चौघे जखमी झाले आहेत. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्या चौघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा अपघात झाल्यावर तातडीने तिथे उपस्थित नागरिकांनी जखमी झालेल्यांची मदत केली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article