आशिष जयस्वालांच्या उमेदवारीमुळे भाजपात कलह:बैठक घेऊन उमेदवारीला विरोध, लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा दिला इशारा

3 days ago 3
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने रामटेक लोकसभेची जागा गमावल्यानंतर येथे विधानसभेतही दमछाक होण्याची चिन्हे आहेत. शिंदे यांनी रामटेक विधानसभेचा उमेदवारी जाहीर करताच भाजपने त्याच्याविरोधात मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जून खरगे आणि भाजप रामटेकमधील पदाधिकाऱ्यांनी आशिष जयस्वाल यांच्या उमेदवारी विरोध केला आहे. जयस्वाल यांची उमेदवारी रद्द करण्याची आग्रही मागणी केली आहे. सोबतच त्यांनी जयस्वाल यांची उमेदवारी कायम राहिल्यास लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती विधानसभेतही होईल, असा इशारा भाजपच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. महायुतीमध्ये रामटेकची जागा शिवसेनेला (एकनाथ शिंदे) मिळाली आहे. शिवसेनेने येथे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांना उमेदवारी दिली आहे. आशिष जयस्वाल मूळचे शिवसैनिक आहे. परंतु, त्यांनी गेल्या निवडणुकीत बंडखोरी केली आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढली. एकनाथ शिंदे यांनी जायस्वाल यांना उमेदवारी जाहीर करताच रामटेक भाजपचे पदाधिकारी बिथरले आहेत. 2019 मध्ये युती धर्म न पाळणाऱ्याला उमेदवारी देण्याबाबत त्यांचा तीव्र विरोध आहे. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जयस्वाल यांची उमेदवारी रद्द करण्याची आग्रह मागणी केली आहे. असे न झाल्यास अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची आणि जयस्वाल यांना पराभूत करण्यासाठी ताकद लावण्याचे संकेतही दिले आहेत. त्यामुळे लोकसभेत रामटेक गमावणाऱ्या शिवसेनेची (शिंदे) विधानसभेत भाजपकडून दमछाक होण्याची चिन्हे आहेत. ...तर पदाधिकारी व कार्यकर्ते राजीनामा देणार रामटेक तालुक्यातील मनसर येथील भाजपच्या कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. त्यात रामटेकची जागा भाजपने लढवावी, अशी भूमिका मांडण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पदाधिकाऱ्यांच्या भावना कळवण्याचा निर्णय घेतला आहे. जयस्वाल यांची उमेदवारी कायम राहिल्यास रामटेक विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचे राजीनामे देतील. सर्व पदाधिकाऱ्यांनी रामटेक येथील शांती मंगल कार्यालयात त्यांचे राजीनामे घेऊन हजर राहण्याची सूचना देखील यावेळी देण्यात आली. जायस्वाल यांच्या उमेदवारीचे भाजपात पडसाद आमदार आशिष जयस्वाल यांनी रविवारी शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पारशिवनी येथील सभेत त्यांची उमेदवारी जाहीर केली होती. शिंदे यांनी जयस्वाल यांची उमेदवारी जाहीर करताच रामटेक भाजपमध्ये पडसाद उमटले. भाजपने पदाधिकाऱ्यांनी समाज माध्यमांवर जयस्वाल यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला. त्यानंतर त्यांनी सोमवारी बैठक बोलावली होती. या बैठकीला माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. राजेश ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष संजय मुलमुले उपस्थित होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article