इगतपुरीत चौरंगी वाटणारी लढत नंतर एकतर्फी, सव्वा लाख मताधिक्यघेत खोसकर विजयी
2 hours ago
1
इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघात कल्याणकारी योजना, लोकसभा निवडणूक निकालाने खडबडून जागा झालेला हिंदू, लाडक्या बहिणींनी परतफेडीसाठी अभूतपूर्व प्रतिसादासह विविध सकारात्मक बाबी पथ्यावर पडत महायुतीचा झंझावात दिसला. यामुळे मतदारसंघात विरोधकांची दाणादाण उडवली. प्रथमच एवढ्या मोठ्या फरकाने महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर निवडून आले. प्रारंभी चौरंगी वाटणारी लढतीनंतर एकतर्फी झाली. या मतदारसंघात माजी आमदार निर्मला गावित यांनी सलग दोनदा निवडून येण्याचा पराक्रम केला होता. त्यानंतर हा पराक्रम खोसकर यांनी केला. काँग्रेस पक्षाचा १५ वर्षापासूनचा अभेद्य बालेकिल्लाही त्यांनी उद्ध्वस्त केला. मोदी व भाजप शिवसेना विरोधी कौल देणाऱ्या या मतदारसंघाने मोदी व भाजप शिवसेनेच्या महायुतीच्या पारड्यात भरभरुन मते टाकली. महायुतीचे खोसकर यांनी सव्वा लाखाच्या आसपास मते मिळाली. प्रतिस्पर्धी काँग्रेस, मनसे, अपक्ष उमेदवारांना २५ हजाराचाही पल्ला गाठता आला नाही. सर्व विरोधकांना मिळालेल्या मतापेक्षाही जास्त मते खोसकर यांनी मिळवत लढत जिंकली. काँग्रेसचे लकी जाधव यांच्या प्रचारासाठी मल्लिकार्जुन खरगे यांनी सभा घेऊनही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. काँग्रेसच्या पराभवासाठी वरिष्ठांनीच हातभार लावल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. इगतपुरी, त्र्यंबकमध्ये काँग्रेस, उबाठा व शिंदे शिवसेनेचे अस्तित्व संपुष्टात आले दोघांनी पक्ष सोडून केली मोठी राजकीय चूक विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांना गद्दार ठरवत काँग्रेस पक्षामधून हाकलण्याची मोठी चूक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अपरिचित व मतदारसंघाबाहेरील उमेदवार काँग्रेसवर लादत पक्षाचा पराभव प्रारंभालाच निश्चित केला होता. माजी आमदार निर्मला गावित यांना उमेदवारी नाकारण्याची घोडचूक मविआने केली. परिणामी काँग्रेस पक्षाचा येथून सुपडासाफ झाला. अपक्ष निर्मला गावित व मनसेचे मेंगाळ यांनी एकाकी लढत दिली. निर्मला गावित यांनी काँग्रेस सोडून तर काशिनाथ मेंगाळ यांनी शिवसेना सोडून यापूर्वी चूक केली होती. पक्ष, विचार, तत्व व नेत्यांपेक्षा स्वत:ला मोठे समजणे हे दोघा माजी आमदारांना भोवले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)