निवडणुकीतील हाराकिरीनंतर काँग्रेसमध्ये नैराश्य:नाना पटोलेंची राजीनामा देण्याची तयारी, पण पक्षश्रेष्ठींचा तूर्त पदावर राहण्याचा सल्ला
2 hours ago
1
काँग्रेस हायकमांडने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिल्लीत बोलवले. त्यांच्या हायकंमाडसोबतच्या चर्चेनंतर ते प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर काही माध्यमांमध्ये नाना पटोले यांनी राजीनामा दिला अशा बातम्या सुरू आहेत. पण काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिलेला नाही, या संदर्भातील बातम्या असत्य असून खोडसाळपणे पसरवल्या जात आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान 2024 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज पराभूत झाले. काँग्रेसचे 2019 मध्ये 44 आमदार निवडून आले. पण या निवडणुकीत काँग्रेसला 16 च उमेदवार निवडून आणता आले. दुसरीकडे नाना पटोले हे सर्वात कमी मतांनी विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये दुसऱ्या स्थानी आहेत. भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघातून नाना पटोले यांनी भाजपचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांचा केवळ 208 मतांनी पराभव केला. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण दरम्यान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे यांचा पराभव झालेला आहे. यासर्वाची नैतिक जबाबदारी स्वीकारत नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या हायकमांडने नाना पटोले यांना वेट अँड वॉचच्या भूमिकेत ठेवला आहे. सभांना गर्दी नसताना मते मिळाली कशी नाना पटोले दिल्लीला जाण्यापूर्वी बोलताना म्हणाले की, निकालावर महाविकास आघाडीचे नेतेही चर्चा करतील. राज्यातला निकाल हा धक्कादायक आहे, राजकीय पक्ष म्हणून आम्हाला आश्चर्य आहेच पण सर्वसामान्यांनाही प्रश्न पडला आहे. भाजपचे हायकमांड पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सभांना गर्दी होत नव्हती तरी त्यांना मतं कशी मिळाली हा प्रश्न लोकांना पडला आहे. सोशल मिडियावर लोक म्हणत आहेत की हे जनतेचं सरकार नाही. लोकांमध्ये ही जनभावना निर्माण झाली आहे. लोकशाहीमध्ये जनता ही सर्वात महत्त्वाची असते. हे जनतेच्या मतांच सरकार नाही, असे जर खुद्द जनता म्हणत असेल तर कुठे ना कुठे तरी दाल मे काला है.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)